नागपुरात रेकी केलेल्या रईस नामक दहशतवाद्याला श्रीनगरमध्ये अटक…

रईसने नागपुरातील (Nagpur) काही भागात रेकी करण्याचा प्रयत्न केला, पण तेथे पोलिस असल्यामुळे तो या प्रयत्नात यशस्वी झाला नाही, असे अमितेशकुमार Amitesh Kumar) म्हणाले.
Amitesh Kumar, Nagpur.
Amitesh Kumar, Nagpur.Sarkarnama

नागपूर : जहाल दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या सदस्याने नागपुरातील (Nagpur) महत्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी (Police) लगेच तपासाची चक्र फिरवली होती. ज्या रईस नामक दहशदवाद्याने ही रेकी (टेहळणी) केली होती, त्याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. सध्या तो श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. कालांतराने त्याला नागपुरात तपासासाठी आणण्याची कारवाई होऊ शकते, अशी माहिती आज पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली.

रईसने नागपुरातील काही भागात रेकी करण्याचा प्रयत्न केला, पण तेथे पोलिस असल्यामुळे तो या प्रयत्नात यशस्वी झाला नाही, त्याला कुण्याही स्थानिकांनी सहकार्य केले असल्याचे आमच्या तपासात अद्याप निष्पन्न झालेले नाही, असेही ते म्हणाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि क्राईम ब्रान्चचे एसीपी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अटकेत असलेला रईस नामक दहशतवादी सध्या काश्‍मीर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला येथे स्थानांतरित करण्याची कारवाई यानंतर होऊ शकते, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

सडेतोड प्रत्युत्तर देण्यास नागपूर पोलिस तयार...

सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलेला आहे. आवश्‍यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यानंतरही दहशतवाद्यांनी कुठे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस यंत्रणा त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. रईस नामक दहशतवाद्याला अद्याप नागपूरमधील रेकी प्रकरणात अटक केलेली नाही. शहरातील काही भागांना नो एंट्री आणि नो फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी झोन घोषित करण्यात आलेले आहेत. रईस जेव्हा नागपुरात आला, तेव्हा कुठे थांबला होता किंवा कुणाकुणाला भेटला होता, याचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे, असे अमितेश कुमार म्हणाले.

१३ जुलै रोजी रईसने मुंबईमार्गे नागपूर गाठलं होतं आणि १५ जुलैला त्याने रेकी केली होती. संघ मुख्यालयाबाहेर आत्मघातकी हल्ल्याचा त्यांचा कट होता. यादरम्यान उमर नामक दहशतवाद्याच्या तो संपर्कात होता आणि रईसचा पूर्ण खर्चदेखील उमरने केला असल्याची माहिती आहे. संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असलेले नागपुरातील संघ मुख्यालय नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर राहिलेले आहे. संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झालेला आहे.

Amitesh Kumar, Nagpur.
जैश-ए-मोहम्मदची संघ मुख्यालय परिसरात रेकी, अमितेश कुमार म्हणाले...

यासीन भटकळसह इतरांचाही होता मुक्काम...

जैश-ए-मोहम्मद या जहाल दहशतवादी संघटनेने नागपुरातील संघ मुख्यालयाच्या इमारतीची रेकी (टेहळणी) केल्यानंतर दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नागपूर शहर हे दहशतवाद्यांचा रेस्ट झोन असल्याचे बोलले जाते. दाऊदच्या हस्तकासह इतरही काही दहशतवाद्यांनी नागपुरात वास्तव्य केलेले आहे.

नागपूर हे दहशतवाद्यांचे रेस्ट झोन असल्याचे बोलले जाते. यापूर्वी अनेक दहशतवादी कारवायांतील दहशतवादी येथे वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, दाऊदचा हस्तक व दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अब्दुल करीम टुंडा याने नागपुरात काही दिवस घालवल्याची कबुली दिल्यानंतर दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा उघडकीस आले होते. त्याच्यासह अनेक दहशतवादी नागपुरात वास्तव्यास होते, अशी माहिती वेळोवेळी समोर आली आहे. १९८५ मध्ये दंगल झाली, त्यावेळी आपण नागपुरात होतो, असे टुंडाने दिल्ली पोलिसांना सांगितले होते. टुंडाने त्या काळात एक संघटना स्थापन केली होती. त्यात युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले होते. मोमीनपुरा भागात या संघटनेतील युवक पथसंचलन करीत होते.

टुंडानंतर दहशतवादी यासीन भटकळ, अखिल खिलजी, अबू फैजल व अब्रार हे दहशतवादीही नागपुरात काही काळ मुक्कामास होते. याचे सबळ पुरावे एटीएसच्या हाती लागले होते. ही पार्श्वभूमी बघता जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी रेकी करणे नवीन नाही. मात्र, कुठलाही धोका होऊ नये, यासाठी पोलिसांनी दीक्षाभूमी, संघ मुख्यालयासह अनेक महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांवर बंदोबस्त वाढविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com