Nana Patole On Satyajeet Tambe : तांबे पिता-पुत्रांनी फसवेगिरी केली; हायकमांड कारवाई करणार...

Nagpur News: मोठा दगाफटका तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेससोबत केला आहे.
Nana patole
Nana patoleSarkarnama

Satyajeet Tambe News : सत्यजीत तांबेंना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. तांबे पिता-पुत्रांवर योग्य कारवाई केली जाणार आहे. पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना आम्ही तिकीट दिली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरून पक्षासोबत फसवेगिरी केली आहे, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नागपुरात (Nagpur) म्हणाले.

डाॅ. सुधीर तांबे यांनी मुलाला अपक्ष भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, मी भाजपचा पाठिंबा घेणार आहे. हा मोठा दगाफटका तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेससोबत केला आहे. भाजपने नाशिक (Nasik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Election) कुणाचाही अर्ज दाखल केला नाही. इकडे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते.

हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाही. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत राहायचे की प्रामाणिक उमेदवारासोबत. त्यामुळे भाजपचे (BJP) ईप्सित साध्य होणार नाही, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

कालही या प्रकाराचे कुणकुण लागली, तेव्हापासून आम्ही यावर लक्ष ठेऊन होतो. रात्री उशिरा हायकमांडसोबत याबाबतची चर्चा झाली. आता हायकमांड यावर निर्णय घेतली आणि पुढची कारवाई केली जाईल. येवढेच तूर्तास सांगता येईल, असेही पटोले म्हणाले. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत राहिलेला आहे. अखेरच्या दिवसापर्यंत कॉंग्रेस आणि भाजपचाही उमेदवार ठरलेला नव्हता. शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट झाला आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपचा पाठिंबा घेतला.

Nana patole
Nana Patole News : नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

इकडे नागपूर शिक्षक मतदारसंघातही कॉंग्रेसचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना नामांकन दाखल केले आहे. विनिंग पोझीशनच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे नाना पटोले यांनी आधी घोषित केले होते. तरी विमाशिच्या सुधाकर अडबाले यांना कॉंग्रेस पाठिंबा देईल, अशी चर्चा होती. पण काल राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सतीश इटकेलवार यांनी अचानक अर्ज दाखल करून बंडखोरी केली. इटकेलवार माघार घेतील, असे सांगितले जात आहे. पण कॉंग्रेसचे अजूनही ठरलेले नाही. येत्या दोन दिवसांत हा तिढा सोडवू, असे नाना पटोले यांनी आज सकाळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com