Congress : काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या तालुकाध्यक्षाला मारहाण !

गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या (Congress) अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष तथा चेकबोरगावचे माजी उपसरपंच गौतम झाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
Congress
CongressSarkarnama

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) : ग्रामपंचायतीजवळच्या बेंचवर बसून सहकाऱ्यांशी चर्चा करित असतांना गावातील विरोधी गटापैकी काहींनी गौतम झाडेंना जातीवाचक शिवीगाळ करित मारहाण केली. तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चेकबोरगाव येथील आठ लोकांवर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या (Congress) अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष तथा चेकबोरगावचे माजी उपसरपंच गौतम झाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी झाडेंच्या तक्रारीवरून आठ जणांविरूध्द अँक्ट्रासिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल रात्रीच्या सुमारास चेकबोरगाव मध्ये हा प्रकार घडला.

काल रात्री गौतम झाडे हे चेकबोरगाव ग्रामपंचायत जवळील सिमेंटच्या बेंचवर सहकाऱ्यांसह गप्पा करत होते. याचवेळी रागाच्या भरात जातिवादक शिवीगाळ करत जानकिराम झाडे, जोगेशवर उपासे, नितीन झाडे, गणेश झाडे, सुनील पोरटे, संदीप शेंडे, गंगाराम राऊत, गणेश भोयर, संजय कोमावार यांनी मारहाण केली. रात्री गौतम झाडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Congress
Nana Patole : देशात काॅंग्रेस आजही बापच, सुजय विखे अजून लहान..

तक्रारिवरून आठ जणांवर भादंवी कलम १४३, १०९, ३२३, ५०४, ५०६ आणि सहकलम (१) (त) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत अट्रॅसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तर संजय कोमावार यांच्यावर मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस उपविभागीय अधिकारी एम. इंगळे यांनी गोंडपिपरीला येऊन घटना जाणून घेतली. पुढील तपास उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय धर्मराज पटले करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in