राजेंद्र मुळक यांनीच केदारांच्या विरोधात बंडखोरी करायला लावली; कंभालेंनी फोडला बॉम्ब...

जिल्हा परिषद (ZP) सदस्य नाना कंभाले यांनी गत निवडणुकीत बंडखोरी केली होती. भारतीय जनता पक्षाची (BJP) साथ घेत त्यांनी सत्ताधारी सुनील केदार (Sunil Kedar) गटाला मात देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
Rajendra Mulak, Nana Kambhale and Sunil Kedar
Rajendra Mulak, Nana Kambhale and Sunil KedarSarkarnama

नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी गत १७ ऑक्टोबरला निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागला. त्यामुळे कॉंग्रेसने आपले सदस्य सहलीला पाठवले होते. आता १ नोव्हेंबरला विषय समिती सभापतिपदांची निवडणूक होऊ घातली आहे. सत्ताधाऱ्यांना कुठलाही धोका पत्करायचा नसल्याने त्यांनी पुन्हा आपल्या सदस्यांना सहलीला पाठवण्याची तयारी केल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.

जिल्हा परिषद (ZP) सदस्य नाना कंभाले यांनी गत निवडणुकीत बंडखोरी केली होती. भारतीय जनता पक्षाची (BJP) साथ घेत त्यांनी सत्ताधारी सुनील केदार (Sunil Kedar) गटाला मात देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. केदारांच्या कुशल आणि आक्रमक व्युव्हरचनेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. कॉंग्रेसचे (Congress) माजी मंत्री जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांनीच माजी मंत्री सुनील केदारांविरोधात बंड करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप बंडखोर सदस्य नाना कंभाले यांनी करून मोठा बॉम्ब फोडला. या निवडणुकीतही असा प्रकार होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या निवडणुकीसाठीही कॉंग्रेस आपल्या सदस्यांना सहलीच्या निमित्त एकत्र ठेवणार आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) सदस्यांनाही सोबत घेणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील अनुभवानंतर सत्ताधारी कॉंग्रेस सावधगिरीने पावले टाकत असून विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत कोणतीही ‘रिक्स’ घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत सर्व सदस्यांना सहलीवर घेऊन जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. चार विषय समिती सभापती पदासाठी १ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. सध्या चारपैकी तीन सभापती पद हे कॉंग्रेसकडे आहे, तर एक पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन पदांची मागणी होत असली तरी कॉंग्रेसकडून एकच पद देण्याची शक्यता आहे. या पदांसाठी कॉंग्रेसकडे अनेक जण दावेदार आहेत. विधानसभा मतदार संघानुसार पद देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या माध्यमातून सावनेर व हिंगणा विधानसभा मतदार संघाला पद मिळाले आहे. त्यामुळे आता उर्वरित चार मतदार संघाकडे चार सभापती पद जाण्याची शक्यता आहे.

Rajendra Mulak, Nana Kambhale and Sunil Kedar
सुनील केदार- राजेंद्र मुळक- नाना गावंडे यांच्यात मतभेद 

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला फुटीची लागण झाली. कॉंग्रेसमधील तीन व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका सदस्याने बंडखोरी करीत भाजपची मदत घेतली. भाजपनेही बंडखोरांच्या मदतीने कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com