रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण ; तहसीलदारांची गाडी पेटवली

पोलिसांची जीप सुद्धा फोडण्यात आली. तुपकर (Ravikant Tupkar)यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkarsarkarnama

बुलढाणा : सोयाबीन आणि कापसाला रास्त भाव मिळावा,सोयाबीनवरील जीएसटी रद्द व्हावा, आदी मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनात हिंसक वळण लागल आहे.

मध्यरात्री बुलढाण्यात तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदारांची जीप जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आला. यावेळी पोलिसांची जीप सुद्धा फोडण्यात आली. तुपकर (Ravikant Tupkar)यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तुपकर गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती खालावल्याने शेतकरी पेटून उठले आहेत. शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदारांची जीप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न स्वाभिमानीचे पादाधिकारी शेख रफीक यांनी केला तर त्यानंतर कार्यकर्त्यांनी चिखली रोडवर रास्ता रोको केला. याठिकाणी रविकांत तुपकर स्वतः रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्ते अजून संतप्त झाले होते.

Ravikant Tupkar
मोदींना उपरती झाली ; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

17 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आज संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्यागाला आज चैाथा दिवस आहे. ठिकठिकाणी  मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले आहेत.

मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली दरम्यान पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या ...तारांबळ उडालेल्या प्रशासनाने सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळले परंतु सद्यस्थितीत तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेतकरी पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तुपकरांच्या घरासमोर जमत आहे. सध्या तुपकरांच्या घरासमोर तणावपूर्ण शांतता आहे.

हिसंक वळणाला सरकारच जबाबदार : तुपकर

रविकांत तुपकर कुठलेही औषध उपचार घ्यायला तयार नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक होउन रात्रीच्या सुमारास गाडी तोडफोड व गाड्या जाळपोळ करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आज गावबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ''अजूनही सरकारला जाग येत नसेल तर मग होणाऱ्या हिंसक आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील,'' असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com