
Amravati Political News : राज्यभरात मराठा, धनगर आरक्षणावरून आंदोलन सुरू आहेत. ओबीसी समाजानेही आपल्या आरक्षणातून कुणाला वाटा देऊ नये म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दुष्काळ, अतिवृष्टीने विदर्भातील शेतकरी अडचणी सापडला आहे. याकडे मात्र सत्ताधाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे समस्यांवरु स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. पिकांची नुकसानीचे पंचनामे, भरपाईसह इतर प्रश्नांकडे सरकारचे वेधण्यासाठी स्वाभिमानी संघटनेतर्फे आंदोलन सुरू केले आहे. (Latest Political News)
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी जयस्तंभ चौकातून हा मोर्चा काढला. वनक्षेत्र अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. मोर्शी तहसीलमध्ये शेतकऱ्यांना सध्या वन्यजीवांचा त्रास सहन करावा लागत आहे. रोही, रानडुक्कर, हरीण, माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून मोर्शी तालुक्यातील शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांनी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे दाद मागितली. वन विभागाने पिकांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. नेत्यांची भेट घेत शेतकऱ्यांनी निवेदनेही दिली. परंतु या मुद्द्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नव्हते. इतर राजकीय पक्षांच्या दुर्लक्षामुळे अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. (Maharashtra Political News)
वन परिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांची भेट घेत शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. प्रवीण मोहोड, सिंबोराचे सरपंच प्रफुल्ल उमरकर, संजय कोल्हे, स्वप्नील कोठे, कपील पडघन, विजय पाटील ढोणे, प्रमोद कुचे, महेंद्र मानकर, दिनेश तायवाडे, विजय लढ्ढा, विशाल निकम आदी यावेळी उपस्थित होते.
'स्वाभिमानी शेतकरी संघटना भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. आम्हाला राजकारणाशी काही देणेघेणे नाही. शेतकरी, शेतमजूर अडचणीत असेल, त्या ठिकाणी आमची संघटना त्यांच्यासाठी धावून जाईल', असे अढाऊ यावेळी म्हणाले.
'शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचेच लक्ष नाही. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस-गारपीट अशी संकटं शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ मारा करीत आहे. वन्यजीवांचा उपद्रवही वाढला आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला या बद्दल गांभीर्य नाही,' असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
'शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.