Swabhimani Shetakari Sanghatana : स्वाभिमानीचा 'एल्गार' ; 40 हजार शेतकरी मोर्चात सहभागी होण्याची शक्यता!

Swabhimani Shetakari Sanghatana : सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळावा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक.
Swabhimani Shetakari Sanghatana
Swabhimani Shetakari SanghatanaSarkarnma

बुलढाणा : परतीच्या पावसाच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची लवकरा लवकर भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना पिकांना योग्य भाव मिळावा, सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. आज स्वाभिमानीकडून बुलढाण्यात (Buldhana)'एल्गार मोर्चा' आयोजन करण्यात आले आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होणार आहे.

आजच्या 'एल्गार मोर्चा'साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कंबर कसली आहे. विदर्भातील विशेषतच सोयाबीन - कापूसच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, हा मोर्चा महत्त्वपूर्ण आहे. या मोर्चाच्या निमित्ताने तुपकर हे अनेक शेतकऱ्यांना भेटून या मोर्चाला पाठबळ आणि पाठींबा देण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळं आजच्या मोर्चात शेतकऱ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे

Swabhimani Shetakari Sanghatana
Andheri Election Result : पहिल्या फेरीत लटकेंची आघाडी, तर 'नोटा'ने घेतली इतकी मतं...

दरम्यान, या मोर्चात सर्वच क्षेत्रातील लोकांनी शेतकऱ्यांशी पाठिशी असावे, असे आवाहन तुपकरांनी केलं आहे. आपल्या ताटातलं अन्न शेतकऱ्याच्या घामाने पिकला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही, तर आपण खायचं काय? टाटा-बिर्ला-अंबानीच्या कारखान्यांमध्ये अजून अन्न निर्मिती होत नाही, असे तुपकर म्हणाले.

Swabhimani Shetakari Sanghatana
Devendra Fadanvis : 'पत्रकाराने विचारलं, 'तुमचं वजन कमी झालंय का?' ; फडणवीसांचं अनोखं उत्तर..

राज्यव्यापी आंदोलनाची आपल्या सुरुवात आपल्या बुलढाण्यातून होणार आहे. बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, हक्कासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहा, 'एल्गार मोर्चा'त आपण सहभाग नोंदवा, असे आवाहन तुपकरांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in