आरोपींसोबत मटण पार्टी करणाऱ्या 'त्या' पोलिसांचं निलंबन

दिलीप धावडे, खुशाल कोचे, राजेंद्र लांबट अशी या निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
आरोपींसोबत मटण पार्टी करणाऱ्या 'त्या' पोलिसांचं निलंबन
Bhandara PoliceSarkarnama

भंडारा : आरोपींसोबत मटण पार्टी करणे पोलिसांना (Bhandara Police) चांगलीच भोवली आहे. भंडाऱ्यात उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आरोपींसोबतच मटण पार्टी केली होती. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले होते आणि प्रसार माध्यमांवरही याबाबतचे वृत्त प्रसारीत करण्यात आले होते. यावर भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव (SP Vasant Jadhav) यांनी दखल घेत मटण पार्टी करणाऱ्या या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. दिलीप धावडे, खुशाल कोचे, राजेंद्र लांबट अशी या निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Bhandara Police
'नोकरीवरून काढण्याची धमकी देत कर्मचाऱ्यांचा भाजप प्रवेश केला जातोय...'

मंगळवारी सकाळी ३:३० वाजताच्या सुमारास भंडारा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू माफियांनी मारहाण केली होती. यावेळी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. २० ते २५ वाळू माफियांनी हा हल्ला केला होता. याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पवनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. त्यांच्या या तक्रारीनंतर आरोपींच्या शोधासाठी काही पोलीस रवानाही झाले होते. मात्र आरोपींना पकडून आणण्यापेक्षा पोलिसांनी त्याच्यासोबत एका हॉटेलमध्ये मटण पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या पार्टीचे व्हिडिओ स्थानिक आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिले होते. कर्तव्यात कसूर करून आरोपींना अभय देणाऱ्या असा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली होती. आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिलेला व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला असून हा व्हिडिओ दाखवत पोलिस आणि वाळू माफिया यांचे संबंध किती सुमधुर आहेत, याची प्रचिती आली, असे आमदार भोंडेकर यांनी म्हटले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पवनी पोलिस कसे पकडतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

Bhandara Police
बच्चू कडू यांना मोठा दिलासा; 9 मे पर्यंत अटक टळली

विशेष म्हणजे पार्टी करताना त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केले संभाषण मोठा धक्कादायक खुलासा करणारे आहे. ‘ही घटना म्हणजे चिल्लर आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे स्वतः उडविली आहेत. पण आपण सल्ला देणे म्हणजे घरावर गोटे आणण्यासारखे आहे’, असे एक पोलिस कर्मचारी सहकाऱ्यांना सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू तस्करीसारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अशाच प्रकारे आरोपींना वाचवत असावे, असा लोकांचा समज आता दृढ होत चालला आहे.

Bhandara Police
कृष्णप्रकाश हे बदलीवर अद्यापही नाराज, पवारानंतर आता ठाकरेंना भेटणार

दरम्यान, या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार भोंडेकर यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. आता यावर भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी निलंबणाची कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.