Dhanorkar : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीवरील स्थगिती कायम..

Chandrapur : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विरोधात गंभीर तक्रारी झाल्या.
MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar
MP Balu Dhanorkar and MLA Pratibha DhanorkarSarkarnama

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विरोधात गेल्या १० वर्षांत अनेक गंभीर तक्रारी झाल्या. त्याउपरही बॅंकेने ३६० पदांची भरती करण्याचा घाट घातला होता. त्याला सहकार विभागाने स्थगिती दिली होती. त्यानंतर बॅंकेने हालचाली करून स्थगिती उठविली. पण नंतर पुन्हा स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

३६० पदांच्या नोकर भरतीबाबत चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळू धानोरकर व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पाठपुरावा करून भरती थांबविण्यात मोठी भूमिका बजावली होती. खासदार धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी हा मुद्दा संसदेत तर आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी विधानसभेतदेखील उपस्थित केला होता. त्यानंतर भरती रोखण्याच्या हालचालींना वेग आला होता. लोकप्रतिनिधींनी सत्यता निदर्शनास आणून दिल्यानंतर १२ मे २०२२ ला सहकार विभागाने स्थगिती दिली होती. त्यावर २३ नोव्हेंबर रोजी स्थगिती उठविण्यात आली होती. मात्र, २९ नोव्हेंबर रोजी सुधारित आदेश निघाले असून, स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार खात्याची मागील १० वर्षात घडलेल्या अनेक गंभीर तक्रारी लपवून ही मान्यता मिळविली होती. २०१७

२०१७ ला विहित कार्यकाळ संपल्यानंतर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे टाळून नोकर भरती, अमाप व अवास्तव खरेदीवर खर्च, मानधनावर लपून छपून भरती, निवृत्त अधिकारी यांना मानधनावर नेमणूक विम्यावर खर्च, अव्यवहार्य पोटनियम दुरुस्ती, शेतकरी कल्याण निधीचा गैरवापर, मुख्य कार्यकारी अधिकारी याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, सहकार खात्याचे फिट अॅड प्रॉपर क्रायटेरिया नियमात न बसणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करून गंभीर गुन्हे लपवून केंद्र व राज्य सरकारची दिशाभूल इत्यादी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शासनदरबारी लावून धरली. काही निवडक मंडळींनी सहकार खात्याची वर नमूद बाबी दडपून बँकेच्या रकमेची उधळपट्टी करीत होते.

MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar
कबड्डीच्या मैदानातही खासदार बाळू धानोरकर अव्वल...;पाहा व्हिडिओ

खासदार धानोरकर बँकेतील काळजीवाहू संचालक मंडळ करीत असलेल्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी अजूनही शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. अनेक गंभीर गैरप्रकार रोखण्यासाठी काही संचालकांनी खासदारांशी संपर्क साधून पुरावे दिले आहेत. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, काही संचालक व अधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com