कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील एकमेव खासदाराचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा...

शिवसेनेत उभ्या फुटीचे ताजे संकट सुरू असताना महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी गुवाहाटीतील बंडखोर शिवसेना आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन केले आहे.
MP Balu Dhanorkar and Uddhav Thackeray
MP Balu Dhanorkar and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेना संकटात असताना शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. एके काळी कट्टर शिवसैनिक राहिलेले आणि महाराष्ट्रातून थेट लोकसभेत निवडून गेलेले कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी मातोश्रीच्या शैलीवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

शिवसेनेत उभ्या फुटीचे ताजे संकट सुरू असताना महाराष्ट्रातून (Maharashtra) लोकसभेवर निवडून गेलेले खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी गुवाहाटीतील बंडखोर शिवसेना आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबतच सरकार चालवले; मात्र आता अचानक असे काय झाले, असा प्रश्न करत यामागे भाजपचा हात असल्याचे ठामपणे सांगितले. या बंडखोर आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ नको असेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, मात्र भाजपला रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे खासदार धानोरकर म्हणाले.

२०१४ व २०१९ या दोन टर्ममध्ये केंद्रातील भाजप सरकारने राबवलेल्या अग्निपथसारख्या उफराट्या निर्णयामुळे भाजपची ध्येयधोरणे देशाला ज्ञात झाली असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. गुवाहाटीतील बंडखोर शिवसेना आमदारांच्या महाराष्ट्रातील कार्यालये व कुटुंबीयांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत समेट व्हायला हवा. नाहीतर दरी वाढून या बंडाला वेगळे वळण मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडविल्यास ५० टक्के आमदार पक्षाच्या बाजूने पुन्हा येतील, अशी आशा खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली.

MP Balu Dhanorkar and Uddhav Thackeray
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

मातोश्रीच्या एकूण कार्यशैली कौतुक करत मी स्वतः शिवसेनेचा आमदार असताना त्यांनी समंजसपणे अनेक विषय हाताळल्याचे खासदार धानोरकर म्हणाले. चंद्रपूरच्या स्थानिक भाजप नेत्यांशी जुळत नसल्याने आपण शिवसेना सोडून काँग्रेसमधून खासदारकीचे तिकीट मिळवल्याचे त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. खासदार धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये राहून शिवसेनेच्या कार्यशैलीवर सध्या स्तुतिसुमने उधळली असली तरी तीन महिन्यांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराविरोधात उघड भूमिका घेतली होती. मात्र आत्ताच्या संकटात आपली भूमिका बदलत शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हे सरकार चालले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी रेटली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com