Sunil Kedar News : फडणविसांच्या आढावा बैठकांना आमदार केदारांनी ‘अशी’ दिली टक्कर !

Sameer Meghe : भाजप आमदार समीर मेघे यांनाही हिंगणा तालुका आढावा बैठकीला बोलविले नाही.
Devendra Fadanvis, Sunil Kedar and Sameer Meghe
Devendra Fadanvis, Sunil Kedar and Sameer MegheSarkarnama

Nagpur District's Hingna Taluka News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात तालुका स्तरावर विकास कामांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यांना टक्कर देण्यासाठी माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी नवा डाव रचत काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेला हाताशी धरून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. (A new initiative 'Zilha Parishad Aplya Dari' has been started)

स्थानीक भाजप आमदार समीर मेघे यांनाही हिंगणा तालुका आढावा बैठकीला बोलविले नाही. यावरून भाजप व काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा परिषदेतर्फे २७ मे रोजी आयोजित तालुका विकास आढावा बैठकीत आमदार समीर मेघे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. सावनेर विधानसभा क्षेत्रातील आमदार सुनील केदार व माजी आमदार रमेशचंद्र बंग यांना बैठकीत बोलाविण्यात आले. याचा निषेध म्हणून भाजप समर्थित असलेल्या ३२ ग्रामपंचायतींमधील सरपंचासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी बहिष्कार टाकला.

हिंगणा तालुक्यातील पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे रखडल्या आहेत. घरकुल मंजुरीचा प्रश्न ऐरणीवर आला. पुनर्वसन गावातील नागरिकांच्या प्रलंबित समस्यासह वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा या समस्यांचा पाढा आढावा बैठकीत सरपंचांनी वाचला. यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरल्याने कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. हिंगण्यातील रेणुका सभागृहात ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत हिंगणा तालुक्यात आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुनील केदार, माजी माजी आमदार रमेशचंद्र बंग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौम्या शर्मा, माजी जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, समाज कल्याण सभापती मिलींद सुटे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळु जोध, शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसंबे, जि. प.सदस्य उज्वला बोढारे, रश्मी कोटगुले,दिनेश बंग, संजय जगताप,पंचायत समिती सभापती सुषमा कावळे, उपसभापती उमेशसिंह राजपूत, सदस्य रूपाली खाडे,संवर्ग विकास अधिकारी बाळासाहेब यावले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पडवे, गटशिक्षणाधिकारी गेडाम,प्रवीण खाडे,आशीष पुंड, शशिकांत थोटे उपस्थित होते.

Devendra Fadanvis, Sunil Kedar and Sameer Meghe
Nagpur District News : नगर पंचायतीला आमदार केदारांचा विरोध, खापरखेड्यात राजकारण तापले !

बैठकीच्या प्रारंभी निलडोह, डिगडोह, वागदरा, नागलवाडी, वडधामना येथील सरपंचांनी पाणी पुरवठा योजनांच्या तक्रारीचा सूर आळवला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे वडधामना येथे पाईपलाईन करिता केलेल्या नाल्या व्यवस्थित न बुजविल्याची तक्रार करण्यात आली. निलडोह व डिंगडोहकरिता २०१८ पासून ४२ कोटींची पाणीपुरवठा योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. काम व्यवस्थित सुरु नाही, हा मुद्दा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित केला.

जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे व काम अर्धवट असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. परंतु दंडात्मक कारवाईसोबत अशा कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड करून त्याचा परवाना रद्द करा, अशा सूचना यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कोकड्डे व उपाध्यक्ष राऊत यांनी दिल्या. हिंगणा तालुक्यातील ५२५२ घरकुलचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.यातील‌ केवळ १२७ घरकुल मंजूर करण्यात आले, ही शोकांतिका असल्याचे अध्यक्ष कोकड्डे म्हणाल्या.

Devendra Fadanvis, Sunil Kedar and Sameer Meghe
Nagpur Metro : मेट्रो स्टेशनसाठी खर्च झाले ४१ कोटी, पण पार्किंगसाठीचा खर्च बघाल, तर बसेल धक्का !

बिडीओ यावले यांनी झुडपी जंगल असल्याने शासननिर्णयानुसार गठीत समितीने घरकुल नामंजूर केल्याची माहिती दिली. सुकळी गुपचुप सरपंच दिनेश ढेगळे यांनी महावितरण कंपनीने हिंगणा फिडरवरून वागदरा फिडरवर वीज पुरवठा दिल्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याची तक्रार केली. चिचोली पठार येथील सरपंच लोहकरे यांनीही वीज पुरवठा खंडित होऊन गाव अंधारात राहत असल्याची ओरड केली. महावितरण अभियंत्यांनी ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.

हिंगणा तालुक्यातील अतीक्रमणग्रस्त गावातील समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित करावी,अशी सुचना उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सौम्या शर्मा यांना दिली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी व सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Devendra Fadanvis, Sunil Kedar and Sameer Meghe
Nagpur BJP News : भाजपला भाकरी फिरवावी लागणार, पण नेत्यांची नाही; तर…

स्थानिक आमदार समीर मेघे यांना बैठकीचे निमंत्रण दिले नाही. याउलट काँग्रेसचे सावनेर मतदार संघाचे आमदार सुनील केदार व माजी आमदार रमेशचंद्र बंग यांना व्यासपीठावर बसविण्यात आले. बाहेरच्या आमदारांना सन्मान व स्थानिक आमदारांना साधे निमंत्रणही नाही, यामुळे आढावा सभेत उपस्थित झालेल्या प्रश्नावर खरंच तोडगा निघणार का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेने कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सुचना दोन दिवसापूर्वी दिली.

सभेला कुणाला निमंत्रित करायचे हे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले. पंचायत समिती प्रशासनाने कुणालाही निमंत्रण पाठवले नाही, अशी माहिती पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी दिली. हिंगणा तालुक्याची आढावा सभा असल्याने स्थानिक आमदारांना प्रोटोकालनुसार बोलाविणे अपेक्षित होते. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असल्याने भाजप आमदारांना बोलावण्याचे टाळले असावे, अशी चर्चा सभेदरम्यान सभागृहात सुरू होती.

Devendra Fadanvis, Sunil Kedar and Sameer Meghe
Nagpur Refinery : पेट्रोकेमिकल रिफायनरीला बारसूत विरोध, पण नागपुरात होण्याची शक्यता !

आगामी लोकसभा निवडणुका (Elections) पाहता पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तालुका स्तरावर विकास कामाच्या आढावा बैठका घेतल्या. यानंतर लगेच काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री तथा आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातुन भाजपला शह देण्यासाठी ग्रामीणमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वीच भाजप व काँग्रेस आमनेसामने उभे ठाकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com