
Nagpur District's Dahegaon Rangari News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ मार्च २०२३ रोजी केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विकास कामांचे उद्घाटन केले. मात्र आता या विकास कामात राजकारण आडवे येत आहे. श्रेय लाटण्यासाठी आमदार सुनील केदार यांनी शासकीय दौरा आयोजित करून दुसऱ्यांदा त्याच कामाचे उद्घाटन केले. (Politics is getting in the way of development work)
फडणवीसांनी उद्घाटन केलेल्या कामांचे दुसऱ्यांदा उद्घाटन करण्याचा दौरा कार्यक्रम आमदार केदारांनी सुरू केला .त्यामुळे दहेगाव (रंगारी) गावात आमदार केदारांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला. किशोर चौधरी यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून आमदारांचा निषेध करण्यात आला.
आमदार सुनील केदार यांच्या शासकीय दौऱ्याचे आयोजन सावनेर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आले होते. दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत परिसरात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विकास कामांचे उद्घाटन केदारांच्या हस्ते करण्यात आले. मात्र यावेळी सरपंच, उपसरपंच, सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य सदर कार्यक्रमाला हजर नव्हते. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे.
केवळ श्रेय लाटण्यासाठी केदार दुसऱ्यांदा उद्घाटन करीत असल्याचा आरोप सरपंच प्रकाश गजभिये यांनी केला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendfa Fadanvis) व माजी मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लाखो रुपये मंजूर केले. मात्र सदर कामांचे उद्घाटन केदार करीत आहेत. केदारांचा उद्घाटन कार्यक्रमाचा दौरा राजकीय दृष्ट्य़ा प्रेरित असल्याचे सरपंच गजभिये यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
दहेगाव रंगारीचा निधी केदारांनी थांबविला..
गेली अनेक वर्षे दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायतीवर केदार गटाची सत्ता होती. मात्र मागील नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (NCP) सत्ता आहे. हातून सत्ता गेल्यामुळे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी मागील नऊ वर्षांपासून विकास निधी दिला नसल्याचा आरोप किशोर चौधरी यांनी केला.
१ ऑगस्ट २०१४ ला आमदार सुनील केदार यांनी लाखो रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले. मात्र निधीच दिला नाही. उलट मंजूर झालेला निधी इतर ग्रामपंचायतींना देण्यात आला असल्याचेही किशोर चौधरी म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.