Sunil Kedar : ‘बैलगाडा’ शर्यत संपली, अन् उफाळला ‘हा’ वाद, केदार म्हणतात, माझा पाठपुरावा सर्वांनाच माहितीये !

Nagpur : श्रेय लाटण्यासाठी आता नवी शर्यत सुरू झाली आहे.
Sunil Kedar and Devendra Fadanvis
Sunil Kedar and Devendra FadanvisSarkarnama

Sunil Kedar on Devendra Fadanvis's Statement : गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला आहे. राज्य सरकारचा हा कायदा मंजूर झाला आहे. मात्र याचे श्रेय लाटण्यासाठी आता नवी शर्यत सुरू झाली आहे. तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. तर विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणतात की, हे आमच्या सरकारचे काम आहे. (Sunil Kedar had done a great follow up for this)

आज (ता. १८) आमदार सुनील केदार म्हणाले, या निर्णयाने मी आनंदित आहे. उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात मोठे वकील आम्ही लावले होते. ग्रामीण भागातील शेतकरी आपल्यापेक्षा जास्त आपल्या जनावरांवर प्रेम करतो. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं याचा आनंद आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर मी यासाठी बैठका घेतल्या. इतिहासात महाराष्ट्राच्या मंत्रालयात पहिल्यांदा या विषयासाठी ओपन ग्राऊंडमध्ये बैठक घेतली होती. ती सभाच झाली होती. सर्वोच्च न्यायालयात जाऊन मी स्वतः वकिलांशी चर्चा केली होती आणि या विषय मार्गी लागावा, यासाठी भरपूर प्रयत्न केले होते, असे आमदार केदार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामाचे श्रेय घेत आहेत. याबाबत विचारले असता, उपमुख्यमंत्री बोलल्यानंतर मी काय बोलू? कुणी काय म्हटलं, यापेक्षा मी काय केलं आणि करू शकतो, यावर माझा भर आहे. कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मनापासून काम केले आणि त्याचे चीज झाले, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी मी काय पाठपुरावा केला, हे राज्याला माहिती आहे, असे केदार म्हणाले.

Sunil Kedar and Devendra Fadanvis
Sunil Kedar : काॅंग्रेसच्या गोटात धाकधूक होती; पण सुनील केदारांनी करुन दाखवले...

ज्यांना श्रेय घ्यायचे, त्यांना घेऊ द्या. पण मी श्रेय घेणार नाही. माझं कर्तव्य आहे. मी शेतकरी कुटुंबातील आहे. श्रेय घेण्याची भूमिका माझी नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे, यावर मी विश्‍वास करतो. या निर्णयानंतर बैलाला भाव मिळेल. पण त्या मागे अनेक विषय आहेत. बैलांची मागणी वाढली, तर बैलांची चांगली जात विकसित होऊ शकते. चांगले बैल आता जोपासले जातील, हा विषय महत्वाचा आहे, बैलांच्या किमतींसोबत त्यांची ब्रीड अपग्रेडेशन महत्वाचे आहे, असे आमदार केदार म्हणाले.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत (Election) शिरूर मतदारसंघात बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा प्रचंड गाजला होता. अमोल कोल्हे यांनी ही निवडणूक जिंकताच त्यांनी संसदेत हा मुद्दा सातत्याने मांडून शर्यतबंदी हटविण्यासाठी आवाज उठविला होता. बैलगाडा शर्यतबंदीच्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्य सरकारच्यावतीने (State Government) नवीन प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यासाठी खासदार अमोल कोल्हे व बैलगाडा संघटनेने मांडलेले मुद्दे सुनील केदार (Sunil Kedar) यांनी विचारात घेतले होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in