सुधीर मुनगंटीवारांचा पाठपुरावा, अन् स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तिवेतनामध्ये झाली दुप्पट वाढ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा एक महत्वाचा निर्णय असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हटले आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी राज्य शासनाकडून (State Government) सन्मान पत्र, निवृत्तिवेतन, इतर आर्थिक साहाय्य व सवलती देण्यात येते. यापूर्वी निवृत्तिवेतन १० हजार रुपये देण्यात येत होते. आता दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा एक महत्वाचा निर्णय असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हटले आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगावा लागला. अनेकांना फटक्यांची शिक्षा झाली किंवा १०० रुपये अथवा यापेक्षा अधिक दंड द्यावा लागला. तुरुंगवास अथवा स्थानबद्धतेत असतानाच मृत्यू आला. काही जण गोळीबारात मरण पावले. काहींना फाशीची शिक्षा झाली. पोलिसांच्या (Police) लाठीमारामुळे कायमचे अपंग झाले. अनेकांच्या उद्योगधंद्याचे अथवा उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊन संपूर्ण मालमत्ता नष्ट झाली, अशा व्यक्तींना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम व अंदमान निकोबार मुक्ती संग्रामामध्ये सहभागी झालेल्या राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तिवेतन (मानधन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन १९६५ पासून सुरू केली. त्यानुसार राज्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पश्चात त्यांच्या विधुर पती/ विधवा पत्नीस निवृत्तिवेतन (मानधन) देण्यात येते. सद्य:स्थितीत राज्य शासन निवृत्तिवेतनधारक स्वातंत्र्य सैनिकांना ०२.१०.२०१४ पासून रु. १०,००० इतके निवृत्ती वेतन देण्यात येत आहे.

Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार कडाडले; वेकोलि अधिकाऱ्यांना म्हणाले, रहिवाशांना त्रास द्याल तर, याद राखा !

केंद्रशासन स्वातंत्र्य सैनिकांनाही दरमहा १०,००० रुपये इतके आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे. यात आणखी १० हजार रुपये इतकी वाढ करून प्रतिमहा २०,००० रुपये इतके निवृत्तिवेतन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक संघटना, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांचेकडून शासनाकडून करण्यात आली. त्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पाठपुरावा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in