...अन्‌ सुधीर मुनगंटीवार मध्यरात्री बारा वाजता पोचले रुग्णालयात!

सुधीर मुनगंटीवार यांनी मध्यरात्री बारा वाजता रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

राजुरा (जि. चंद्रपूर) : नियोजित कार्यक्रम संपायला रात्रीच्या १२ वाजल्या. पण, त्यानंतरही राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याची (Farmer) राजुरा उपजिल्हा रुग्णालयात (hospatil) जाऊन विचारपूस केली. मुनगंटीवार रुग्णालयात पोचले, तेव्हा रात्रीच्या बारा वाजून गेल्या होत्या. मात्र, उशीर होऊनही जखमी शेतकऱ्याची विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. (Sudhir Mungantiwar went to the hospital at midnight and questioned injured farmer)

Sudhir Mungantiwar
‘हर्षवर्धन पाटीलसाहेब, तुमचा त्रास कमी झाला का..? नसेल तर आपल्याकडील पान्याने टाईट करू’

चुनाळा येथील शेतकरी अजय नत्थू कार्लेकर यांना २ सप्टेंबर रोजी शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यांच्यावर राजुरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा येथील (ता. ३ सप्टेंबर) दौऱ्यात सुधीर मुनगंटीवार यांना दिली. राजुरा येथील कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे भेट घेता आली नाही. पण, या घटनेची आठवण ठेऊन गडचांदूरचा कार्यक्रम आटोपून रात्री १२ नंतर मुनगंटीवार हे दवाखान्यात पोचले. त्यांनी गंभीर जखमी शेतकऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कुळमेथे यांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. उपस्थित उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याचा आदेश दिला.

Sudhir Mungantiwar
सावंतांचा काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेला धक्का; एक हजार कार्यकर्ते-पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

घटनेचे गांभीर्य, गरीब शेतकऱ्याच्या परिस्थितीची जाणीव मनात ठेऊन रात्रीच्या १२ वाजून गेल्यानंतही मुनगंटीवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची भेट घेतली. एरवी मंत्री संबंधिताना फोनवर आदेश देऊन मोकळे होतात. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी तसे न करता मध्यरात्रीच्या १२ वाजून गेल्यानंतरही जखमी शेतकऱ्याची प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच, रुग्णालय प्रशासनाला उपचाराबाबत सूचना करत वन अधिकाऱ्यांना आर्थिक मदतीबाबत आदेश दिले.

Sudhir Mungantiwar
कट्टर विरोधक नारायण पाटील-रश्मी बागल येणार एकत्र; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा पुढाकार

या वेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रभारी तहसिलदार गांगुर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी येल्केवाड, कैलाश कार्लेकर, मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर पचारे, माजी अध्यक्ष संजय कार्लेकर, घनश्याम कार्लेकर, संदीप पारखी, रत्नाकर पायपरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com