Sudhir Mungantiwar : स्वैराचारासाठी ‘ते’ एकत्र येत आहेत; पण, ये पब्लिक है, ये सब जानती है...

Nitish Kumar : त्यांना स्वैराचार करणारे सरकार पाहिजे आहे.
Sudhir Mungantiwar, Nitish Kumar, Uddhav Thackeray and Sharad Pawar
Sudhir Mungantiwar, Nitish Kumar, Uddhav Thackeray and Sharad PawarSarkarnama

Sudhir Mungantiwar on Bihar's Chief Minister Nitish Kumar) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महाराष्ट्रात येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. कारण त्यांना काम करणारे सरकार नव्हे, तर स्वैराचार करणारे सरकार पाहिजे आहे, अशी घणाघाती टिका राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नितीश कुमार यांच्यावर केली. (Nitish Kumar will come to Maharashtra and meet Sharad Pawar and Uddhav Thackeray)

मंत्री सुधीर मुनगंटीवार खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेण्यासाठी गोंदियात आले असता आज (ता. ८ मे) पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नितीश कुमार यांनी देशातील विरोधी पक्षांना भेटावं आणि विरोधी पक्षांचा एकसूत्री आणि एककलमी कार्यक्रम असावा. पण यांच्या एकसूत्री कार्यक्रम हा सत्तेसाठी असून आपली सत्ता कशा प्रकारे टिकवता येईल, यासाठी नितीश कुमार हे महाराष्ट्रात येत आहेत.

महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेण्यामागचे एकमेव कारण म्हणजे त्यांना केवळ आपली सत्ता टिकवून ठेवायची आहे. देशातील इतर राज्यांमध्ये जाऊन सर्व विरोधी पक्षांना त्यांनी एकत्र करावं. कारण विरोधी पक्षाचा एककलमी कार्यक्रम देशाच्या प्रगतीचा, देशाला आत्मनिर्भर करण्याचा असला पाहिजे. पण त्यांच्या एककलमी कार्यक्रम फक्त खुर्ची मिळवण्याचा आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले

Sudhir Mungantiwar, Nitish Kumar, Uddhav Thackeray and Sharad Pawar
Sudhir Mungantiwar : 'गोवारी'चे राजकारण कुणी केलं नाही, पण खारघरच्या दुर्घटनेवर राजकारण होतंय !

नितीश कुमारांना (Nitish Kumar) स्वतःच राज्य सांभाळता येत नाही. त्यांच्या राज्याला पुढे नेण्यासाठी जो वेग पाहिजे, तो त्यांच्याकडे नाही आणि महाराष्ट्रात (Maharashtra) येऊन काही नेत्यांना ते भेटणार. कशासाठी..? तर, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नको आहेत म्हणून. यांना स्वैराचारी सत्ता पाहिजे. त्यासाठी त्या लोकांचा हा सर्व आटापिटा चाललेला आहे. पण ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’, असे म्हणत जनता त्यांना धडा शिकवेलच, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in