Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवारांच्या माजी स्वीय सहाय्यकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; काय आहे प्रकरण?

Sudhir Mungantiwar: सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल...
Sudhir Mungantiwar, Crime
Sudhir Mungantiwar, Crime Sarkarnama

Sudhir Mungantiwar News : भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी स्वीय सहाय्यकावर नोकरीला लावून देण्याच्या आमिषाने पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच स्वीय सहाय्यकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात येत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे माजी स्वीय सहाय्यक अजय धवणे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती धवणे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. यावेळी पीडित तरुणाने धवणे यांच्यावर गंभीर आऱोप देखील केले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून नोकरीला लावण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळल्याचं व्हिडीओतील संबंधित व्यक्तीनं केला आहे.

माझी स्वीय सहाय्यक अजय धवणे याने नोकरीला लावण्याच्या आमिषानं धवणे यांनी १३ लाख रुपये उकळले असल्याचा आरोपही त्या पीडित तरुणानं केला आहे. यावेळी धवणे हा नोकरीला लावण्याच्या आमिषाने १ ते ३० लाखांपर्यंत पैशांची मागणी करतो अशी देखील चर्चा आहे.

Sudhir Mungantiwar, Crime
NCP News : राष्ट्रवादीला धक्का ! महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदाराला न्यायालयानं सुनावली 'ही' शिक्षा

पैसे दिलेल्या पीडिताने धवणे यांना गाठत मारहाण केली. त्यांचे नाव मुनगंटीवारांशी जोडले जात असल्यानं या प्रकरणावरून विरोधक मुनगंटीवार यांना घेरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यामुळे सुधीर मुनगंटीवार या प्रकरणावर काय बोलतात? याकडे लक्ष लागले आहे.

Sudhir Mungantiwar, Crime
BJPने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही, ‘महाविकास’ म्हणून आम्ही पुढे जातोय...

या सर्व प्रकरणावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, धवणे यांची स्वीय सहाय्यक पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण धवणे यांचे नाव मुनगंटीवारांशी जोडले जात असल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक भूमिका घेत मुनगंटीवारांची कोंडी करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com