
Sudhir Mungantiwar's Statement on Samana : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकात मतदान करताना मराठी माणसाला जास्तीत जास्त मते देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन करीत कर्नाटक विधानसभेत मराठी आवाज बुलंद करावा, असे म्हटले होते यावर बोलताना महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जाती, धर्म, पंथ सर्व भेद बाजूला सारून लोक कर्नाटकमध्ये मतदान करतील. (Marathi voice should be raised in Karnataka Legislative Assembly)
...तर ते कर्नाटकच्या विकासात बाधा निर्माण करेल !
आज (ता. ८ मे) गोंदियात आले असता, मंत्री मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि कर्नाटकच्या विकासासाठी फार चांगले काम केलेले आहे. कर्नाटकचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्यामुळे कर्नाटकमधील लोक विचार करून मतदान करतील. जर का जाती-पातीवर मतदान झाले, तर ते कर्नाटकच्या विकासाला बाधा निर्माण करणारे ठरेल.
जो चित्रपट लोकांना आवडतो, तो ते बघतात..
“दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”, असे ट्विट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे. याबाबत विचारले असता, ही केदार शिंदेची भावना आहे. लोकांनी कोणता चित्रपट पाहावा, यासाठी आपण लोकांसाठी कायदा तयार करू शकत नाही, की लोकांना जो चित्रपट आवडतो, तो ते बघतात, असे मुनगंटीवार म्हणाले.
सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात शरद पवार पुन्हा आले. भाजपचे लॉजिंग - बोर्डिंग रिकामाच राहिलं, अशी टीका अग्रलेखात करण्यात आली. यावर बोलताना महाराष्ट्र वनमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, सामना हे वृत्तपत्र नसून पॉम्प्लेट आहे. त्यात ते काय लिहितात, त्याचे उत्तर आम्ही कशाला द्यायचे. ते वर्तमानपत्र कुठे आहे? सामनाच्या माध्यमातून शिवसेना आपल्या पक्षाचे विचार मांडत असते. त्यात जनतेचा विचार कुठे केला जातो, असा प्रश्न त्यांनी केला.
संजय राऊतांसाठी नितेश राणे आहेत..
संजय राऊत (Sanjay Raut) काय बोलतात, त्याचे उत्तर देण्यासाठी भाजपने (BJP) नितेश राणे (Niesh Rane) यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या कोणत्याही प्रश्नाच्या संबंधाने नितेश राणे हेच उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.