Sudhir Mungantiwar News : असे एक कोटी ओवेसी जन्माला आले तरी मोदी बनू शकत नाही, मुनगंटीवारांची जहरी टिका !

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री दुसऱ्याच्या सांगण्यावरून पत्र लिहीत असतील, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.
Asaduddin Ovasi, Sudhir Mungantiwar and Narendra Modi
Asaduddin Ovasi, Sudhir Mungantiwar and Narendra ModiSarkarnama

Sudhir Mungantiwar on Asaduddin Ovasi's Statement : बारसू प्रकल्पाला पूर्ण गावकऱ्यांचा विरोध नाही, तर काही निवडक लोकांचा विरोध आहे. बारसूचा विरोध हा फक्त गुणात्मक प्रदूषण या बाबतीत नसून फक्त विरोधासाठी विरोध केला जात आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Opposition is being made just for the sake of opposition)

गोंदिया येथे आज (ता. ८ मे) आले असताना मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. बारसू रिफायनरी प्रकल्पावर तोडगा निघणार का या विषयावर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बारसूची जागा निश्चित करण्यासाठी त्यांनीच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. आता ते म्हणतात की मी ते दुसऱ्याच्या सांगण्यावरून पत्र लिहिलं जर मुख्यमंत्री दुसऱ्याच्या सांगण्यावरून पत्र लिहीत असतील, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिनेमा सेक्टरमध्ये असते तर, त्यातही ही ते टॉपवर असते, असे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केले. याबाबत विचारले असता, असे एक कोटी ओवेसी जन्माला आले तरी नरेंद्र मोदी बनू शकत नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी असदुद्दीन ओवेसींवर जहरी टिका केली.

Asaduddin Ovasi, Sudhir Mungantiwar and Narendra Modi
Sudhir Mungantiwar : स्वैराचारासाठी ‘ते’ एकत्र येत आहेत; पण, ये पब्लिक है, ये सब जानती है...

अजित पवाराच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या..

या आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे असताना ते कितीदा मंत्रालयात बसायचे, त्याची श्वेतपत्रिका काढून लोकांना वाटा. त्यांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्या. हजारो दारूच्या बाटल्या सापडतात, हे मंत्रालयाचे काम आहे का, असा सवाल सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उपस्थित केला. विद्यमान मंत्री फक्त मंत्रालयात (Mantralaya) बसत नसून फिरत असतात, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com