मुनगंटीवारांची मोठी घोषणा: मविआ सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे करणार पूर्ण

Sudhir Mungantiwar | दोघांचे मंत्रिमंडळ होते तेव्हाही आणि आता विस्तार झाल्यानंतरही राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत.
Sudhir Mungantiwar |
Sudhir Mungantiwar |

चंद्रपूर : आज -उद्या मंत्रिमंडळाला खातेवाटप केले जाईल. 15 ऑगस्टपूर्वी हे खातेवाटप होईल. पण खातेवाटप झाले नाही म्हणून काम थांबलेले नाही. दोघांचे मंत्रिमंडळ होते तेव्हाही आणि आता विस्तार झाल्यानंतरही राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. ते चंद्रपूर येथे बोलत होते.

मागील सरकारने तीन कॅबिनेट बैठका घेतल्या पण एकही निर्णय घेतला नाही. केवळ चहा-बिस्किटे खाऊन बैठक संपवली, असा टोलाही त्यांनी लगावला. आज पूरग्रस्तांच्या संदर्भातील आणि आरोग्यांच्या संदर्भातील बैठक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत दहा-बारा निर्णय घेतले आहेत.

Sudhir Mungantiwar |
Sanjay Shirsat : बंडखोर आमदारांना चूक केली असं वाटतयं ; शिरसाटांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

हे बिनचेहऱ्याचे सरकार असल्याची टीका आज सामनातून करण्यात आली. त्यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सरकार गेल्यानंतर अशी वक्तव्ये केली जातात. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. आमची त्यांच्याप्रती सहानुभूती आहे. तसेच, पूरग्रस्त शेतकऱ्यांना चार-पाचशे रुपयांची मदत करून त्यांची थट्टा करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यावर, मुनगंटीवार यांनी यापुढे असे होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

त्याचबरोबर अधिकारी किंवा प्रशासनाच्या चुकीमुळे असा प्रकार कुठे होत असेल तर त्याची लगेच दखल घेतली जाईल आणि शेतकऱ्यांना भरपूर मदतीचा हात दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, मविआ सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येतील .त्यांच्याबद्दल आमच्या मनात कोणाविषयी कपटाची भावना नाही. आमचा रस्ता थेट जनतेच्या हृदयापर्यंत जातो. मी अर्थमंत्री असताना टाटा ट्रस्टच्या सहकार्याने जे कॅन्सर हॉस्पिटल मंजूर केले होते त्याचे येत्या २६ जानेवारीला उदघाटन करेन, अशी घोषणा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com