
Santosh Rawat firing case : कॉंग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गेल्या आठवड्यात (ता. ११ मे) मूल येथे गोळीबार झाला होता. यासंदर्भात मुनगंटीवार यांनी वारंवार जिल्हा पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत आणि आता कारवाई करण्याचे निर्देश देऊन अहवाल मागवला आहे. (A report has been called for with instructions to take action)
मूल येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेसमोरून दुचाकीने रावत जात असताना चारचाकी (एम.एच.३४-६१५२) वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोरांनी चेहरे झाकले होते. गोळी झाडताच हल्लेखोर नागपूरच्या दिशेने पसार झाले. यात हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला जखम झाली होती.
या गोळीबारात कॉंग्रेस संतोष रावत सुदैवाने बचावले. त्याच्या डाव्या हाताला गोळी चाटून गेली. या घटनेने राजकीय वर्तुळ हादरले. दरम्यान मूल येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला होता. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या अटकेसाठी निदर्शनेही केली होती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी नऊ पथक गठीत केली.
जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय नेत्यावर (Political Leader) हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. रावत यांचे कुणाशीही वैर नाही. मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झाडली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आठवडा उलटून गेला तरीही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही.
संतोष रावत यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा मास्टर माईंड शोधून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी लाऊन धरण्यात आली आहे. दरम्यान पालकमंत्री (Guardian Minister) मुनगंटीवार यांनी याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. सातत्याने या प्रकरणाचा फॉलोअप ते घेत होते.
आरोपींना अटक करण्यासंदर्भात त्यांनी पोलिस (Police) अधीक्षकांना निर्देश दिले होते. तरीही आरोपी अद्याप मोकाटच आहेत. म्हणून आज (ता. १९) मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. ‘हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व सविस्तर अहवाल कळवावा.’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.