महाविकास आघाडी पुढील पाचशे वर्षे येणाऱ्या सरकारला दिशादर्शक ठरेल...

Sudhir Mungantiwar| Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून टीका एवढचं कार्य सुरू असून आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar sarkarnama

अमरावती : " भारतीय जनता पार्टी (BJP) म्हणून आम्ही कधीही कोणतेही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण एक खर आहे की यांच्या चुकीच्या कारणामुळे यांच्या आमदारांची जर आज नार्को टेस्ट केली तर सर्वजण म्हणतील की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नको," अश्या शब्दात भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडीला सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आज (ता.19 जून) अमरावतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. (Sudhir Mungantiwar Latest Marathi News)

Sudhir Mungantiwar
मोदींचे बालमित्र अब्बास अली म्हणाले, अहमदाबादमध्ये आम्ही कधी भेटलोही नाही...

मुनगंटीवार म्हणाले, ज्या पद्धतीने सरकार वागतयं यामुळे तर मला वाटतयं की, हे सरकार पुढचे पाचशे वर्षे येणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी माणसाने कसे वागू नये यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा खोचक टोला त्यांनी शिवसेना व महाविकास आघाडी सरकारला लगावला.

Sudhir Mungantiwar
शेवटच्या क्षणी खडसेंची खेळी : ठाकूर कुणाला दणका देणार?

जनतेच्या आशीर्वादाने 2024 ला राज्यात आमचे सरकार नक्की सत्तेत येईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, सध्या राज्याचे मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून टीका एवढेच कार्य सुरू असून आहे. राज्याचे प्रश्न, समस्यांवर काही निदान किंवा उपाययोजना न करता येता-जाता फक्त केंद्र सराकरवर टीका करणे म्हणजेच मुख्यमंत्र्याचे संविधानिक कर्तव्य आहे. यांच्या संविधानामध्ये एकच वाक्य आहे की, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आणि केंद्रावर टीका केली की महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होतो. यापेक्षा पुढे काहीही नाही, असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Sudhir Mungantiwar
राष्ट्रवादीचे आमदार जेथे मुक्कामाला तेथेच राम शिंदेंनी लावली फिल्डींग

दरम्यान, आज शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे. ईश्वर त्यांना चांगली सद्बुद्धी देऊन जनतेची सेवा आणि त्याच्या हातून चांगले कार्य घडो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com