तुपकरांच्या आंदोलनाला यश, केंद्र व राज्य सरकारकडून बैठकीचे निमंत्रण
Ravikant Tupkar

तुपकरांच्या आंदोलनाला यश, केंद्र व राज्य सरकारकडून बैठकीचे निमंत्रण

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचे (Ravikant Tupkar) अन्नत्याग आंदोलन करत होते.

बुलढाणा : बुलढाण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या आंदोलनाला यश आले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा करत रविकांत तुपकरांना वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले आहे.

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचे गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन चालू होते. केंद्र व राज्य सरकारने रविकांत तुपकरांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा केली व यानंतर सोयापेंड देशात आयात करणार नाही, याबाबत पुढील आठवड्यात आदेश करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Ravikant Tupkar
भाजपच्या बावनकुळेंना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक?

तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील रविकांत तुपकरांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली व यासंदर्भात दिल्लीत चर्चा करू, असे आश्वासन दिले. तर त्यांच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही रविकांत तुपकरांशी फोनवरून चर्चा करत तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री व वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकरांना 24 नोव्हेंबर 2021 रोजी बैठकीचे निमंत्रण दिले असून त्यांंच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 24 नोव्हेंबरला ही बैठक पार होणार आहे.

या बैठकीला संबंधित खात्याचे मंत्री व सचिव उपस्थित राहणार आहे. दरम्यान राज्य सरकार व रविकांत तुपकरांमध्ये बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्ती केली आणि त्यांच्या विनंतीनंतर तुपकरांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांकडून आलेले बैठकीचे निमंत्रण हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया तुपकरांनी दिली. मात्र, जर दोन्ही सरकारांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यावेळी महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन केले, पुढच्या वेळी भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in