Sudhir Mungantiwar, Devendra Fadanvis, Radhakrishna Vikha Patil and others at wardha.
Sudhir Mungantiwar, Devendra Fadanvis, Radhakrishna Vikha Patil and others at wardha.Sarkarnama

Mungantiwar : स्वातंत्र्याचा संग्राम गांधीजींच्या, तर मोदींच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प !

चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर आणि वर्धा जिल्ह्यात आष्टी या दोन ठिकाणी क्रांती झाली. त्यानंतर युनियन फ्लॅग खाली आला आणि तिरंगा वर चढला, असे नवे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

नागपूर ः राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या उपक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले, ही मोठी गोष्ट आहे. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यासाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. वर्धा जिल्ह्याच्या भूमीतून स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला. ‘चले जाव’ आणि ‘भारत छोडो’चा मंत्र देण्यात आला, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर आणि वर्धा जिल्ह्यात आष्टी या दोन ठिकाणी क्रांती झाली. त्यानंतर युनियन फ्लॅग खाली आला आणि तिरंगा वर चढला आणि त्यानंतर कुठे देश स्वतंत्र झाला, असे राज्याचे नवे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आज वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ सीडी प्रकाशित करून झाला. मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, गांधीजी की जय, लालबहादुर शास्त्री की जय आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देऊन भाषणाची सुरुवात केली. व्यासपीठावर आजच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, (Radhakrishna Vikhe Patil) विशेष मार्गदर्शक जलपुरूष मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्र सिंग, खासदार रामदास तडस, आमदार नागोराव गाणार, आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार रणजीत कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. शाहीर नंदेश उमप आणि गायिका बेला शेंडे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्याचा संग्राम गांधीजींच्या नेतृत्वात सुरू झाला आणि सुराज्याचा संकल्प पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सुरू झाला. त्यासाठी हा सेवा पंधरवडा आहे. दिन दयाल उपाध्याय यांच्या विचारांच्या व्यासपीठावर ही सुरुवात झाली. राज्याने ही सुरुवात केली. जो जो वांछिल तो ते लाहो, या भावनेने मोदी काम करत आहेत. आई आपल्या मुलाचे कधीही नुकसान होऊ देत नाही, त्याचप्रमाणे मोदीसुद्धा देशाच्या एकाही नागरिकाचे नुकसान होणार नाही, यासाठी काम करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन २०२० मध्ये करायचे होते. पण दोन वर्ष उशीर झाला. आज फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झाले, याचा अभिमान आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे न्यायाचं मंदिर व्हावं, ही जबाबदारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या खांद्यावर आता आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar, Devendra Fadanvis, Radhakrishna Vikha Patil and others at wardha.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘किसानों के लिये, अब सरकार उतरी मैदान मे !’

हा परिसर १८६२ मध्ये वर्धेचा भाग झाला. पूर्वी वर्धा हा नागपूर जिल्ह्यात होता. मी पालकमंत्री असताना अर्धवट राहिलेली कामे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. आता ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता डी फॉर देवेंद्रच नाही तर डी फॉर डेव्हलपमेंट, असे असेल. यापूर्वी आमच्या सरकारच्या काळात नाट्यगृहाचा जीआर शेवटी काढण्यात आला. नंतर अडीच वर्ष आपले सरका नव्हते. आता प्रत्यक्ष नाट्यगृहाशी माझा संबंध येत नसला तरी मी मागेल ते मला फडणवीस देतात. त्यामुळे नाट्यगृह लवकरच होईल, असा विश्‍वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com