बंद करो ललकारी, म्हणत आमदार जोरगेवारांनी टोचले सत्ताधारी अन् विरोधकांचे कान...

नव्याने सुरू झालेला हा प्रकार थांबला नाही तर तो भविष्यातला मोठा धोका ठरू शकतो, यातून राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित होणार नाही, असे आमदार जोरगेवार (Kishor Jorgewar) म्हणाले.
MLA Kishor Jorgewar
MLA Kishor JorgewarSarkarnama

नागपूर : सध्या राज्यात सभेला सभेतून उत्तर देण्याचा नवीन प्रकार सुरू झाला आहे. हा प्रयोग पक्ष हिताचा असू शकतो, मात्र तो समाज हिताचा नक्कीच नाही. राज्यात (Maharashtra) सतत सुरू असलेल्या सभांमुळे राज्यातील मूळ प्रश्न बाजूला सारले जात आहेत, असे सांगत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही कान टोचले आहेत.

आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) म्हणाले, पोलीस (Police) प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. समाजा-समाजांत तेढ निर्माण होत आहे. या सभांमधून नेते (Political Leaders) केवळ एकमेकांना ललकारत आहे. परिणामी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शत्रुत्व निर्माण होत आहे. त्यामुळे अशा राजकीय सभा केवळ निवडणुकांपुरती मर्यादित ठेवाव्या आणि समाज हिताच्या प्रश्नांकडे अधिक प्रखरतेने लक्ष देत समाजाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची असल्याचे आहे. ‘बंद करो ललकारी, पुरी करणी है जिम्मेदारी’, असे म्हणत त्यांनी टिका केली आहे.

राजकीय पक्षांची गर्दी..

सभांमध्ये होणारी गर्दी राज्याने पाहिली आहे. मात्र सध्या सभा घेण्यासाठी सुरू असलेली राजकीय पक्षांची गर्दी निवडणुकांव्यतिरिक्त झाल्याचा इतिहास नाही. हिंदू ह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, शरद पवार, प्रमोद महाजन यांच्या सभांना होणारी गर्दीही राज्याने पाहिली आहे. मात्र या सभांना जाणारा हा नागरिक असायचा. सभेतून बाहेर निघाल्यावर तो हक्कांप्रति जागृत होऊन निघायचा. मात्र आज सुरू असलेल्या संभामध्ये जाणारा ८५ टक्के वर्ग हा त्या-त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या सभांचा समाजाला उपयोग नाही. नव्याने सुरू झालेला हा प्रकार थांबला नाही तर तो भविष्यातला मोठा धोका ठरू शकतो, यातून राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित होणार नाही, असे आमदार जोरगेवार म्हणाले.

पोलिसांवर ताण..

अशा सभांमधून होणारे वक्तव्य शांतीप्रिय असलेल्या राज्यातील समाजा समाजामध्ये वैर निर्माण करेल आणि हे राज्यहितासाठी घातक ठरेल. या सभांमध्ये गर्दी वाढविण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांना एकत्रित केल्या जात आहे. याचा परिणाम रुग्णवाहिका व महत्वाच्या वाहतूक व्यवस्थेवरही जाणवत आहे. पोलीस प्रशासनावरती ताण निर्माण होत आहे. मुंबईत किंवा इतर ठिकाणी झालेल्या सभांचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. परिणामी संपूर्ण राज्य या सभांमुळे प्रभावित होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि सर्व प्रमुख पक्षांच्या पदाधिका-र्यांनी पक्ष हित बाजूला ठेवत राज्यहितासाठी एकत्रित येत अशा सभा केवळ निवडणुकांपुरत्या मर्यादित ठेवण्यावर एकमताने निर्णय घेण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखवली आहे.

MLA Kishor Jorgewar
Video: पाणीपुरवठा ठप्प, आमदार जोरगेवार संतापले...

शक्तीप्रदर्शन कराने, मात्र..

राज्य जेमतेम कोरोना संकटातून सावरत आहे. अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. लग्न समारंभाचे दिवस सुरू आहे. त्यामुळे व्यापाराला गती आहे. अशात या सभांमुळे सामाजिक व्यवस्थाही बिघडत आहे. सभा दोन तासांची असली तरी त्याच्या नियोजनासाठी कित्येक दिवस तयारी करावी लागते. यात संपूर्ण व्यवस्था व्यस्त होत असते. आणि या सभेतून समाजाला मिळते ती नेत्यांनी एकमेकांना दिलेली ललकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच लागणार आहे. नेत्यांनी या निवडणुकांमध्ये जाहीर सभा घेत शक्ती प्रदर्शन करावे, मात्र राज्यात भारनियमन, पेयजल संकट आणि महागाई चे संकट आहे. यावर चर्चा झाली पाहिजे.

अशा सभांमुळे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. काही दिवसांत शेतीचा हंगाम सुरू होणार आहे. त्याच्या नियोजनाकडे सर्व पक्षांनी लक्ष दिले पाहिजे. निवडणुकांपुरते राजकारण निवडणुका संपल्यात की समाजकारण हे आता सर्व पक्षांनी आपल्या कृतीतून दाखवावे. सुरू असलेल्या या संभांचा केवळ आणि केवळ दुष्पपरिणामच राज्यावर होत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आमचा पक्ष आहे, असे म्हणणाऱ्या सर्व राजकारण्यांनी ते कृतीतुनही दाखवून द्यावे, असे आवाहन किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com