Shivsangram : शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील एकनाथ शिंदे गटात

Balasahebanchi Shivsena : कार्यकर्त्यांचे शिंदे गटामध्ये बाजोरिया यांनी जाहीर प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले.
Akola
AkolaSarkarnama

Akola News : स्व. विनायक मेटे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश घेतला. अकोला (Akola) येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा संघटक माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत संदीप पाटील यांनी हा प्रवेश घेतला.

स्व. विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम पक्षातील प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये बाजोरिया यांनी जाहीर प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गोपाल नागापुरे यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पक्षात प्रवेश घेतला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना स्वीकारून पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष संघटन करून पक्ष मजबूत करणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

शिंदे गटाकडून पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना नेमकी कोणती जबाबदारी द्यायची आहे. हे अद्याप निश्चित झाले नसले तरी त्यांना समिती निर्णय घेऊन योग्य ते पद देईल, असे माजी आमदार व शिंदे गटाचे जिल्हा संघटक गोपीकिशन बाजोरिया यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, अश्विन नवले, शहराध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिंदे गट भाजपच्या साथीने राज्यात चांगलीच घोडदौड करीत आहे. उद्धव ठाकरेंच्या सैनिकांना गळाला लावण्याशिवाय इतर पक्षांतील लोकांनाही आपल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात घेण्यासाठी त्यांचे पदाधिकारी दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत. विदर्भ मराठवाड्यातही यांनी आपल्या लोकांना चांगली ताकद दिली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता जास्तीत जास्त प्रवेश करवून घेण्यावर त्यांचा भर आहे. विदर्भात ताकद वाढविण्यावर शिंदे गटाचा विशेष भर आहे.

Akola
एकनाथ शिंदे गटाचे टार्गेट, मराठा समाजाचे नगरसेवक

नागपुरात नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासह इतर ११ विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात मोदींनी शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. सरकारने केलेली कामे घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. एकुणच काय तर आगामी निवडणुकांची तयारी जोमात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com