प्रदेशाध्यक्षांचा इन्कार, पण कॉंग्रेसचे आमदार नाराज; आज हायकमांडला भेटणार!

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीसुद्धा काँग्रेसचा (Congress) आमदार नाराज नसल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी केला होता. काँग्रेस आमदारांच्या तदारसंघांना विकास कामांमध्ये प्राधान्य देत नसल्याच्या तक्रारी आहेत.
Congress MLAs in Delhi
Congress MLAs in DelhiSarkarnama

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये जशी धुसफुस सुरू आहे, तशी ती महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही आहे. त्यातल्या त्यात कॉंग्रेसमध्ये त्याचे प्रमाण जास्त असल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून दिसते. राज्यातील आमदार राष्ट्रकुल प्रशिक्षणासाठी सध्या दिल्लीत आहे. कॉंग्रेसच्या आमदारांनी काल कॉंग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन नाराजी दर्शविली आहे. आज ते सोनिया गांधी यांना भेटणार आहेत.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री यांनी पक्षाचे आमदार नाराज नाहीत, असा दावा केला असला तरी विदर्भातील कॉंग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली असता वरिष्ठ नेत खरे बोलत आहे, असे वाटत नाही. युवा तसेच प्रथमच निवडून आलेल्या आमदार प्रशिक्षणासाठी दिल्लीत एकत्र आले आहेत. आमदारांनी जाण्यापूर्वीच सोनिया गांधी यांची भेट मागितली होती. तेव्हापासूनच काँग्रेसचे आमदार स्वतःच्या मंत्री, महाविकास आघाडीवर नाराज आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या वृत्ताचा इन्कार केला. प्रशिक्षणासाठी सर्व आमदार दिल्लीला जात आहे. या दरम्यान आपल्या नेत्यांना भेटावे अशी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे भेट मागितली आहे. त्यात काही वावगे नाही. याचा अर्थ आमदार नाराज आहेत, असा होत नसल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले होते.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनीसुद्धा काँग्रेसचा आमदार नाराज नसल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी केला होता. काँग्रेसचे मंत्री आमदारांकडे लक्ष देत नाही, निधी वाटप करताना काँग्रेसच्या प्रतिनिधींना झुकते माप देत नाही, काँग्रेस आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांना विकास कामांमध्ये प्राधान्य देत नसल्याच्या तक्रारी आहेत. याउलट राष्ट्रवादी आपल्या आमदारांना अधिकाधिक निधी देत आहेत. त्यांना अधिक भक्कम करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे, असाही आरोप आमदारांचा आहे.

Congress MLAs in Delhi
काॅंग्रेस आमदाराची खदखद बाहेर : बाळासाहेब थोरातांविरुद्ध जाहीर नाराजी

मित्रपक्षांच्याबाबतही शंकाच!

विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. ते काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी राजीनामा देऊन सुमारे वर्षभराचा कार्यकाळ लोटला आहे. मात्र राज्यपाल त्रुट्या काढून हे पद भरण्यास टाळाटाळ करीत आहे. विरोधकांसोबतच मित्र पक्षांमार्फतही यास छुपा विरोध असल्याची शंका आमदारांना आहे.

समान कार्यक्रम गायब..

महाविकास आघाडी स्थापन करताना समान कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. काँग्रेसला इतरांच्या तुलनेत निधी दिला जात नाही. विधानसभेचे अध्यक्षपद भरले जात नाही याकडे लक्ष घालावे अशी मागणी सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com