शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले निघाले दुचाकीवर...

शेतकऱ्यांनी मिळत असल्याचे सांगितले व समस्येचे निराकरणसुद्धा केले जात असल्याचे सांगितल्यावर त्यांनी Eknath Dawale समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले निघाले दुचाकीवर...
Eknath Dawale on the Bike for Farmers.Sarkarnama

सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : राज्याचे मुख्य सचिव म्हटले की मोठा थाट, गाड्यांचा ताफा, लवाजमा बघायला मिळतो. पण या सर्व गोष्टींना फाटा देत, कोणताही बडेजाव न करता कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले शासकीय वाहन सोडून दुचाकी वर २ किलोमीटर प्रवास करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांची शेतकऱ्यांशी व मातीशी असलेली नाळ घट्ट असल्याचे बघायला मिळाले.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये शासकीय दौऱ्यावर असलेले कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी शासकीय वाहन सोडून चक्क दुचाकीवर स्वार होऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. राज्याच्या एवढ्या मोठ्या पदावर असलेला प्रशासनाचा अधिकारी चक्क दुचाकीवरून पिके पाहण्यासाठी शेतामध्ये आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले. अशा अधिकाऱ्यांच्या ताफ्यामध्ये अनेक वाहने पहायला मिळतात. त्यामुळे स्थानिक अधिकारीसुद्धा रस्त्यालगत असलेल्या शेताची व पिकांची पाहणीसाठी निवड करत असतात.

शेतकऱ्यांची खरी परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असतो. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले हे ‘सिस्टम’च्या उलट वागताना बघायला मिळाले. त्यांनी तालुक्यातील निमखेड गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. परंतु पिके पाहणीसाठी शासकीय वाहन ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा शेतकऱ्यांच्या शेतीची निवड केली आणि चक्क दुचाकीवर बसून शेतकऱ्यांच्या शेतात गेले. करडीसह अन्य पिकांची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांसोबत विविध पिकांबाबत चर्चा केली. कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते काय, असे विचारले असता शेतकऱ्यांनी मिळत असल्याचे सांगितले व समस्येचे निराकरणसुद्धा केले जात असल्याचे सांगितल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

Eknath Dawale on the Bike for Farmers.
वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा ठरणार निर्णायक; अंतिम यादीकडे इच्छुकांचे लक्ष...

तालुक्यातील निमखेड गावामध्ये तब्बल ९७ हेक्टर मध्ये शेतकऱ्यांनी करडी पिकांची लागवड केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी करडी पिकांचा प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम केले. त्यामुळे तालुक्यातील १८ गावांमध्ये १५० हेक्टरपेक्षा जास्त करडी पिकांची लागवड केली आहे. करडी हे पारंपरिक पीक असून मागील काही वर्षांपासून या पिकाकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु यावर्षीपासून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी करडी पिकाची लागवड केली आहे. रब्बी हंगामातील पिकांचा फायदा शेतकरी घेताना दिसून येत आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी कृषी ए. के. मिसाळ, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्यासह कृषी साहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडून पुढील वर्षासाठी सोयाबीन पिकाचे नियोजन

मागील काही वर्षापासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे अनेक वेळा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून पुढील वर्षासाठी सोयाबीन पिकाचे नियोजन केले जात आहे. मागील काही वर्षांपासून सोयाबीन बियाणांचा तुटवडा शेतकऱ्यांना जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेले सोयाबीन पुढील वर्षाच्या पेरणीसाठीचे नियोजन करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in