Nagpur : `स्टॅंडर्ड’ आणी ‘गरीब शेतकरी माणूस’, दोघेही येणार एकाच मंचावर...

Congress : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसने विलंब केला.
Nana Patole and Prafull Patel
Nana Patole and Prafull PatelSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. शुक्रवारी प्रफुल्ल पटेल यांनी ‘मी स्टॅन्डर्ड लोकांवर बोलतो’, असे नमूद करीत नाना पटोले यांना हिणवले होते. त्यावर पटोले यांनीही आज ‘मी गरीब माणूस आहे, त्यांच्या स्टॅन्डर्डचा नाही’, असे सांगून प्रत्युत्तर दिले.

नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्त आयोजित महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत उद्या रविवारी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या ३० जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप व मित्र पक्ष जोमाने कामाला लागले. त्या तुलनेत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसने विलंब केला.

त्यांच्या रणनीतीसाठीही विलंब होत आहे. रविवारी सिव्हिल लाइन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह येथे अडबाले यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विदर्भातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे विदर्भातील जवळपास सर्व नेते उपस्थित राहणार आहे. पण मुख्य आकर्षण असणार आहेत, ते नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल. कारण कालपासून दोघेही एकमेकांची फिरकी घेत आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह खासदार बाळू धानोरकर, आशिष दुवा, माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार सर्वश्री रणजीत कांबळे, सुभाष धोटे, राजू पारवे, राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे धर्मराव आत्राम, मनोहर चंद्रिकापुरे, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे कॉंग्रेस शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे राहणार आहेत.

Nana Patole and Prafull Patel
...हा तर आमच्यासह पत्रकारांचाही अपमान : मोहन माकडे

विदर्भातील सर्व राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद मानमोडे, ग्रामीणचे प्रमुख राजेंद्र हरणे यांच्यासह पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी खासदार, माजी आमदार उपस्थित राहणार आहेच. महाविकास आघाडीच्या या बैठकीत अडबाले यांच्यासाठी रणनीती ठरणार आहे. भाजपने प्रचाराला सुरुवात केली असून आपच्या उमेदवारासह २२ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या रणनीतीनंतर निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in