Ajit Pawar News: महाविकास आघाडीत फूट? नार्वेकरांवरील अविश्वास ठरावावरुन अजित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले..

MVA Political News: '' जर मी सहमती दर्शवली असती तर...''
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar : नार्वेकरांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर अजित पवारांची सहीच नाही? 'मविआ'त खळबळ!Ajit Pawar News: महाविकास आघाडीच्या आमदारांनी आम्हांला विधानसभेच्य़ा सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत विधानसभा सचिवांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, या प्रस्तावावरुन महाविकास आघाडीत फूट पडली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचं कारण म्हणजे या प्रस्तावाविषयी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. (Ajit Pawar Latest news)

हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.30) शेवटचा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. आघाडीच्या 39 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. मात्र, याच ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांचीच स्वाक्षरी नसल्याची धक्कादायत बाब समोर येत आहे. याविषयी अजित पवार यांनी आपल्याला या ठरावाविषयी कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : नार्वेकरांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर अजित पवारांची सहीच नाही? 'मविआ'त खळबळ!

अजित पवार म्हणाले, मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली असती तर त्यावर माझी स्वाक्षरी असती. पण मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar
Winter Session : फडणवीसांची गुगली; ...तर नाथाभाऊ तुम्हीच थांबवले असते ना आमचे लग्न!

विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचं हे पत्र दिलं. या पत्रावर महाविकासआघाडीच्या ३९ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत.पण त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी नसल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महाविकासआघाडीने विधानसबा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. याचवेळी आघाडीच्या आमदारांनी नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव दाखल करत असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाच अंधारात ठेवल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com