Ajit Pawar news : अजितदादांनी घेतली गोगावलेंची फिरकी; मंत्रिपदाच्या शपथविधीला हजेरी लावणारच...

हिवाळी अधिवेशनाचा आज (27 डिसेंबर) सातवा दिवस आहे.
Ajit Pawar | Bharat Gogawale
Ajit Pawar | Bharat GogawaleSarkarnama

Ajit Pawar News : हिवाळी अधिवेशनाचा आज (27 डिसेंबर) सातवा दिवस आहे. राज्याचे विधान सभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाबद्दल महत्त्वाचा भूमिका मांडल्या. या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना त्यांनी सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनाही टोला लगावत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

राज्यात तुमचं सरकार स्थापन झालं तेव्हा पहिले काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारभार पाहत होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला पण मोजक्याच लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. आजही काही आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दिल्लीला फोन करून एकदाचा मंत्रिमंडळाचा विस्तार करून टाका, असे टोलाही अजित पवार यांनी लगावला.

Ajit Pawar | Bharat Gogawale
OBC Reservation : मोठी बातमी ; ओबीसी आरक्षणशिवाय नगरपालिका निवडणुका ; न्यायालयानं सांगितलं,..

शिंदे -फडणवीस सरकारला सहा महिन्यात मंत्रिमंडळात एक महिला आमदार मिळाली नाही, अशी खंतही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. आता अमृतावहिनांच सांगतो, म्हणजे महिला आमदारांना मंत्रीपद तरी देतील, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. आमदार भरत गोगावले मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कधीपासून सूट शिवून बसलेत. त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीला दुनियेत कुठेही असला तरी मी तिथे उपस्थिती लावणार, असे सांगताच पवारांनी सभागृहात जोरदार हशा पिकला.

दरम्यान, राज्यात सप्टेंबरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) -देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करण्याची वल्गना करतात. बारामतीत आमचं काम आहे. मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन, असे खुले आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com