विस्तार अधिकाऱ्यासाठी पेटून उठल्या सभापती, मग सीईओंनीही ठेवले नियमांवर बोट...

आता नागपूर (Nagpur) जिल्हा परिषद गाजतेय ती एका विस्तार अधिकाऱ्याच्या बदलीवरून. शिक्षण सभापती विस्तार अधिकाऱ्याच्या बदलीसाठी पेटून उठल्या.
विस्तार अधिकाऱ्यासाठी पेटून उठल्या सभापती, मग सीईओंनीही ठेवले नियमांवर बोट...
Nagpur ZPSarkarnama

नागपूर : जिल्हा परिषदेमधील बदल्या म्हटल्या की, बदल्या कमी अन् चर्चाच जास्त होते. त्यातही शिक्षकांच्या बदल्या म्हणजे एके काळी पदाधिकाऱ्यांसाठी पर्वणीच असायची. पण आता नागपूर (Nagpur) जिल्हा परिषद (ZP) गाजतेय ती एका विस्तार अधिकाऱ्याच्या बदलीवरून. शिक्षण सभापती विस्तार अधिकाऱ्याच्या बदलीसाठी पेटून उठल्या. पण सीईओंनीही नियमांवर बोट ठेवत बदली नाकारली. या प्रकाराची जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगली आहे.

विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीवरून शिक्षण सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. शिक्षण सभापती बदलीसाठी अडून बसल्या होत्या. परंतु सीईओंनी नियमावर बोट ठेवत बदली नाकारली. एका विस्तार अधिकाऱ्याच्या बदलीसाठी सभापतींनी स्थायी समितीत चांगलाच थयथयाट केला. पण एकाही सदस्याने त्यांची बाजू घेतली नाही. अन् सीईओंनी (CEO) निर्णय घेऊन टाकला.

संबंधित विस्तार अधिकारी यापूर्वी मुख्यालयात होत्या. त्यांच्याकडे एक तालुक्याचा वरिष्ठ पदाचा प्रभार आहे. विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांनी निवड केली होती. या प्रकरणी त्यांची एक वेतनवाढही थांबविण्यात आली आहे. पंचायत राज समितीसाठी शिक्षकांकडून निधी गोळा करण्याबाबतचा संदेशही त्यांच्याच तालुक्यातील असल्याची चर्चा आहे. त्या वादग्रस्त असल्याचे सांगण्यात येते. नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. यात संबंधित विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय होता. नागपूर पंचायत समितीत बदली होणार होती. तशी मागणी त्यांची होती. परंतु नियमावर बोट ठेवत सीईओ योगेश कुंभेजकर यांनी बदली नाकारली. त्यामुळे स्थायी समितीत शिक्षण सभापती भारती पाटील यांनी हा विषय उचलून धरला.

Nagpur ZP
नागपूर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य सभापतींवर वैतागल्या

बदली नाकारण्याची कारणे त्यांनी सीईओंना विचारले. त्यापूर्वी मुख्यालय होत्या. नागपूर पंचायत समिती मुख्यालयाचा भाग असल्याने त्यांनी बदलीस पात्र नसल्याचे उत्तर सीईओंनी दिले. सभापती आग्रही असल्याने दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. बदलीवरून एवढा बाऊ केल्याने सर्वच सदस्य आश्चर्य चकित झाले. विशेष म्हणजे सभापतींच्या विषयाला एकही सदस्यांनी पाठिंबा दिला नाही. कुणीही मध्ये पडले नाही. सीईओंनी नियमावर बोट ठेवत बदली होणार नसल्याची भूमिका कायम ठेवली. हा विषय जिल्हा परिषदेत विशेषतः शिक्षण विभागात चांगलाच चर्चेला बनला आहे.

शिक्षण समितीत ठराव..

विस्तार अधिकाऱ्याचा बदलीचा विषय शिक्षण समितीतही चर्चेला. नागपूर पंचायत समिती हा मुख्यालयाचा भाग आहे, याबाबत शासनाला मार्गदर्शन मागण्याचा ठराव शिक्षण समितीत घेण्यात आला. बदलीचा विषय राज्यभर गाजत असून सरकारमधील मंत्री अडचणीत आले. एका बदली एवढा आटापिटा होत असल्याने विविध चर्चा रंगल्या आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in