Ravikant Tupkar : सोयाबीन-कापसाच्या भावासाठी आता आरपारची लढाई !

एलगार मोर्चाच्या निमित्ताने शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) जिल्हाभर फिरत आहेत. आता मोर्चाची तयारी आणि नियोजन जवळपास अंतिम टप्प्यात असून २ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांनी बुलडाणा (Buldana) तालुक्यातील रायपूर, भादोला, वरवंड, डोंगर खंडाळा या भेटी दिल्या.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रविवारी निघणारा मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी आहे. शेतकऱ्यांना कुणी कमी लेखू नये, शेतकऱ्यांचीच (Farmers) ताकद सरकारला वठणीवर आणू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि सोयाबीन - कापसाला भाव मिळवून घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. आता ही आरपारची लढाई आहे, शेतकऱ्यांना (Farmers) वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आपली ताकद दाखवू देऊ, इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. २ नोव्हेंबर रोजी वरवंड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

एलगार मोर्चाच्या निमित्ताने शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) जिल्हाभर फिरत आहेत. आता मोर्चाची तयारी आणि नियोजन जवळपास अंतिम टप्प्यात असून २ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांनी बुलडाणा (Buldana) तालुक्यातील रायपूर, भादोला, वरवंड, डोंगर खंडाळा या भेटी दिल्या. या चारही ठिकाणी झालेल्या सभांना युवक, शेतकरी आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. उत्स्फूर्त प्रतिसाद या सर्व गावांमध्ये मिळाला. रविवारी होणारा एल्गार मोर्चा हा तमाम शेतकरी, शेतमजुरांच्या रोषाचे प्रतीक ठरणार आहे. यापुढे सोयाबीन-कापूस आंदोलनाचे प्रमुख केंद्र म्हणून बुलडाण्याची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी एल्गार मोर्चात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजुरांच्या समस्यांबाबत बोलायला सध्या कुणीच पुढे येत नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच आपल्या हक्काची लढाई लढावी लागणार आहे. भीक मागण्यासाठी नव्हे तर आपला हक्क मागण्यासाठी आपण मोर्चा काढत आहोत. मोर्चात सहभागी होणे हे कमीपणाचे नव्हे तर अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सर्वांनी या मोर्चात सहभागी होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे मायमाउल्यांनी आशीर्वाद देण्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले. पक्ष, राजकारण आणि संघटना बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. त्यामुळे कुणाच्या दबावाला आणि भूलथापांना बळी न पडता आपल्या हक्कासाठी मोर्चात सहभागी व्हा, सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे.

Ravikant Tupkar
Video: सरकारनामा विशेष | संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची बेधडक मुलाखत

एक दिवस बळीराजासाठी..

आपल्या ताटात दररोज जे अन्न आहे ते शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेले आहे. जगाचा अन्नदाता म्हणवला जाणारा शेतकरी आज संकटात आहे. निसर्गाने झोडपले आणि आता सत्ताधारी, विरोधक - शासन, प्रशासन अशा सर्वांनीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. शहरातील नागरिकांनीही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बळ देण्याची नितांत गरज आहे. नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, काळीपिवळी, ऑटोचालक, दुकानदार अशा सर्वच घटकांनी एक दिवस आपल्या बळीराजासाठी देऊन शेतकऱ्यांचा हा एल्गार आणखी बुलंद करावा, असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in