कुणी पिस्तूल काढतंय, तर कुणी ‘चून चूनके मारूंगा’ म्हणतं; यांच्यासाठी कायदा नाही का?

आज नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, सरकारने (State Governmet) गव्हर्नरकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज घडीला राज्यातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यावर कोणी बोलायला तयार नाही.
Warun Sardesai
Warun SardesaiSarkarnama

नागपूर : काल अमरावती दौऱ्यावर असताना माझी सुरक्षा काढली असल्याचं मला कळलं आणि कुणाला सुरक्षा द्यायची व नाही द्यायची हे ठरवणं शासनाचं काम आहे. सोबतच नागरिकांच्या सुरक्षेची देखील जबाबदारी शासनाची असते. मात्र सत्तेतले आमदार कधी पिस्तूल काढताय तर ‘चून चूनके मारूंगा, अशी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. कार्यकर्त्यांना डोकी फोडायला सांगतात व टेबल जामीन करण्याचे आश्वासनदेखील देतात. हे सर्व सोडून या सरकारच्या लक्षात येत नाही का, असे म्हणत युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

आज नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, सरकारने (State Governmet) गव्हर्नरकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज घडीला राज्यातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यावर कोणी बोलायला तयार नाही. ओला दुष्काळ अजूनही शेतकऱ्यांना जाहीर झाला नाही. त्यावरही कोणी बोलायला तयार नाहीत, कोणाची तरी सुरक्षा काढून वादग्रस्त बोलायचं, हे फोडाफोडीचं राजकारण बंद व्हायला हवं व महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासाकडे सरकारने लक्ष द्यायला हवं.

Warun Sardesai
युवा सेना आक्रमक; कार्यकर्ते म्हणाले, तिकीट द्यायचे नसेल तर स्पष्ट सांगा...

भाजपच्या नेत्यांना विषयाला बगल देण्याची सवय लागून गेलेली आहे. खरं तर वेदांता प्रकल्प गेला त्यावेळी युवा सेनेने महाराष्ट्रभर मोठे आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आदित्य ठाकरे व आम्ही सर्व युवा सेनेचे पदाधिकारी यांनी सरकारला विनंती केली होती की किमान हा टाटा एअर बसचा प्रकल्प तरी नागपूर येथील मिहान मध्ये झाला पाहिजे. जेणेकरून विदर्भातील तरुणांना चांगला रोजगार मिळेल आणि हा प्रकल्प नागपूरमध्ये होणार असं स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे. मात्र आता हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर उगाच महाविकास आघाडीच्या नावानं खापर फोडायचं, हे बरं नव्हं. काही चांगलं झालं तर आम्ही केलं आणि वाईट घडलं तर त्यांच्यामुळे घडलं, ही पद्धत आता बंद झाली पाहिजे, असे वरुण सरदेसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in