...तर तेव्हा मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन !

बाबरी ढाचा पाडला गेला, त्यावेळी आम्ही तेथे होतो, मी स्वतः तेथे होतो आणि त्यावेळी मी नगरसेवक होतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
...तर तेव्हा मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन !
Devendra Fadanvis at Nagpur Airport with chandrashekhar Bawankule. Sarkarnama

नागपूर : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले जे मर्सीडीज बेबी आहेत, त्यांना संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांना संघर्ष पाहण्याचीही गरज पडली नाही. त्यामुळेच ते कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात. पण कितीही थट्टा उडवली तरी आमच्यासारख्या लाखो कारसेवकांना गर्व आहे की, ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला गेला, त्यावेळी आम्ही तेथे होतो, मी स्वतः तेथे होतो आणि त्यावेळी मी नगरसेवक होतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासोबत होते.

बाबरी मशीद पाडण्यावरून फडणवीसांवर टिका करण्यात आली. १८५७ च्या लढ्यातही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सहभागी झाले होते, अशी टिका त्यांच्यावर करण्यात आली आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी हिंदू आहे मागचा जन्म आणि पुर्नजन्मावरही माझा विश्‍वास आहे. त्यामुळे १८५७ मध्ये जर मी राहिलो असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी तेव्हा लढत असेन आणि तुम्ही असाल, तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल, असा जोरदार पलटवार करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार टोला लगावला. आज तुम्ही अशा लोकांशी युती केली आहे की, जे १८५७ च्या लढ्याला युद्धच मानत नाहीत. ते शिपायांचे बंड होते, असे ते म्हणतात. त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, असे त्यांनी सांगितले.

न्यायालयाचा निकाल म्हणजे सरकारचे अपयश..

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटले, ते मला अद्याप समजलेले नाही. पण प्राथमिकरित्या जे कळले, त्यानुसार ५ महिने पूर्ण झालेले आहेत, ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवता येत नाही. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हे १०० टक्के सरकारचे अपयश आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने २ वर्ष टाइमपास केला, ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यामुळेच न्यायालयाचा असा निर्णय आला आहे.

Devendra Fadanvis at Nagpur Airport with chandrashekhar Bawankule.
बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मी उपस्थित होतो: फडणवीस

ओबीसींची अपरिमित हानी..

न्यायालयाने सांगितले की, सरकार ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाहीये. किती दिवस थांबायचे आणि सरकारने नवीन कायदा केला तो अमलात आणलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत आणि हा निर्णय दिला. या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी झाली आहे. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. सरकारने योग्य भूमिका कधी मांडलीच नाही, योग्य प्रकारे कार्यवाही केली नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे समजून घेऊ आणि आमची पुढील भूमिका मांडू, असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.