Nagpur : तर रेशन दुकानदारांना आत्महत्या कराव्या लागतील, कॉंग्रेस रेशनिंग कमिटीचा आरोप !

Ration shopkeepers : जनतेसाठी हा निर्णय चांगला असला तरी रेशन दुकानदारांसाठी दुर्दैवी आहे.
Guddu Agrawal, Ration shopkeeper.
Guddu Agrawal, Ration shopkeeper.Sarkarnama

Ration shopkeepers News : केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आता प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेद्वारे मिळणारे धान्य मोफत देण्यात येणार आहे. जनतेसाठी हा निर्णय चांगला असला तरी रेशन दुकानदारांसाठी दुर्दैवी आहे. यापूर्वी दुकानदारांना जे १५० रुपये कमिशन मिळत होते, ते आता मिळणार नाही. त्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश कॉंग्रेस (Congress) रेशनिंग कमिटीचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर ऊर्फ गुड्डू अग्रवाल म्हणाले, केंद्र सरकारच्या (Central Government) या योजनेमुळे रेशन दुकानदार रस्त्यावर येतील. कारण आतापर्यंत रेशन दुकानदारांना दर महिन्याला कमिशन मिळत होते. या कमिशनमुळे रेशन दुकानदारांचे कुटुंब पोसले जात होते.

मुलांचे शिक्षण, दुकानाचे भाडे, इलेक्ट्रिक बिल, नोकराचा पगाराचा खर्च निघत होता. पण आता असे होणार नाही, कारण की आता मोफत धान्य कार्डधारकांना दिले जाणार आहे. रेशन दुकानदाराने कार्डधारकाकडून पैसे घ्यायचे नाही. सद्यःस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या कमीशनचे पैसे १ वर्षापासून मिळालेले नाहीत. याचप्रमाणे प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेचे कमिशनचे पैसे दर महिन्याला मिळत नाहीत.

असेच सुरू राहिले तर दुकानदारांचा उदरनिर्वाह कसा होईल. दुकानदाराला संपूर्ण परिवारासहित आत्महत्या केल्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. रेशन दुकानदारांचे कमिशन ३०० रूपये. करण्यात यावे व कमिशनचे पैसे दर महिन्याला १ ते ५ तारखेपर्यंत दुकानदाराला मिळाले पाहिजे, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी गुड्डू अग्रवाल यांनी केली आहे.

Guddu Agrawal, Ration shopkeeper.
ऐन दिवाळीच्या तोंडावर रेशन दुकानदारांच्या कमिशनवर अधिकाऱ्याचा डल्ला !

शासनाकडून एपीएल धान्य लवकर सुरू झाल्यास रेशन दुकानदाराला कमिशन मिळणे सोयीचे होईल. महाराष्ट्रामध्ये ५७ लाख कार्ड आहेत. ज्याची लोकसंख्या २ कोटी २० लाख आहे. एपीएल धान्य सुरू झाले तरीही दुकानदारांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने सामान्य जनतेचा विचार करताना दुकानदारांच्या बाबतीतही विचार केला पाहिजे. नाहीतर गरीब लोकांना जगवण्यासाठी दुकानदारांचा जीव घेणारा हा निर्णय ठरेल, असेही गुड्डू अग्रवाल म्हणाले. मागणीचे पत्र त्यांनी नागपूरचे अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in