Shyam Manav : आतापर्यंत अनेक बाबांचा भांडाफोड केला; त्यांनी नागपुरात, पत्रकार परिषदेत स्वीकारावं आव्हान...

Dhirendra Maharaj : नागपूरमध्ये हे आव्हान न स्वीकारता त्यांच्या रायपूर दरबारात आव्हान स्वीकारलं आहे.
Shyam Maharan and Dhirendra Maharaj, Nagpur.
Shyam Maharan and Dhirendra Maharaj, Nagpur.Sarkarnama

Dhirendra Maharaj News : अखिल भारत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचे पुन्हा आव्हान दिलं. पण महाराजांनी नागपूरमध्ये (Nagpur) हे आव्हान न स्वीकारता त्यांच्या रायपूर दरबारात आव्हान स्वीकारलं आहे. तसे न करता त्यांना नागपुरात पत्रकार परिषदेत आमचं आव्हान स्वीकारावं, असं श्‍याम मानव आज नागपुरात म्हणाले.

धीरेंद्र महाराजांकडे माहिती मिळवण्याच्या विविध यंत्रणा आहेत. त्यामुळे त्यांनी हे आव्हान त्यांच्या दरबारात नाही, तर नागपूर येथे पत्रकार परिषदेत पंचसमितीच्या समोर स्वीकारावं, असं श्याम मानव म्हणाले. ९ जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं.

हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. श्याम मानव यासंदर्भात सांगताना म्हणाले, धीरेंद्र महाराजांच्या दाव्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रीतसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिलं आहे. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्वरूपात हे आव्हान दिलं आहे.

Shyam Maharan and Dhirendra Maharaj, Nagpur.
Shya Manav : यांचे धीरेंद्र कृष्ण महाराजांना पुन्हा आव्हान, म्हणाले या नागपुरात !

या आव्हानाच्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण हे दावे करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते. तशाप्रकारे आम्ही अनेक बाबांच्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही. कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दावा करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचू नये, याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते. त्यासाठी आम्ही स्पष्टपणे म्हटलं की, ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही. ही प्रक्रिया नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाईल, असंही श्याम मानव यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com