...म्हणून विधानसभा अधिवेशन काळात मंत्री सत्तारांनी काढला तीन दिवसीय विदर्भ दौरा

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

Abdul Sattar : राज्यात मागील महिन्याभरात जोरदार पाऊस झाला. काही भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अशातच राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विरोधी पक्षांकडून नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीवरून राज्य सरकारला घेण्याची तयारी सुरू आहे. अशा वेळी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्याची पाहणी सत्तार करत आहेत.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी या दौऱ्या संदर्भात सांगितले की, विदर्भात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी उद्धवस्त झाल्या. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मी विदर्भ दौऱ्यावर आलो आहे. त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करा. त्यांना धीर द्या. सरकार तुमच्या पाठीशी असल्याची हमी द्या. नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपात होऊ देऊ नका. कोणताही शेतकरी सुटणार नाही, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Abdul Sattar
अब्दुल सत्तार, संजय राठोड आक्रमक होताच शिंदे नरमले; कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

ते पुढे म्हणाले की, पंचनामे करताना शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवावा. शेतकरी राज्य सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मी देणार आहे. सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे. विरोधी व सत्ताधारी आमदारांची मागणी आहे की, आमच्या मतदार संघातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती आहे. त्यावर सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी. विधानसभेत काल ज्या सूचना झाल्या त्या सूचना मी लिहून घेतल्या आहेत. त्यावर सोमवारी मुख्यमंत्री अथवा मी उपाययोजना करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वी दोन हेक्टरचा नियम होता. आता तीन हेक्टरचा केला आहे. मदत निधीही दुप्पट करण्यात आला. एकंदर परिस्थिती पाहता कोरडवाहूला किती व बागायतला किती निधी द्यायचा याची ढोबळ घोषणा झाली आहे. सोमवारपासून अंमलबजावणीची घोषणा करण्यासाठीच मी तीन दिवसांचा पाहणी दौरा करत आहे. मी मुंबईत न राहता नागपूरला आलो आहे. आज किती नुकसान झाली किती नाही याचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Abdul Sattar
Abdul Sattar Video : शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार वादात

पूर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत दिली जाईल. एकही आपत्तीग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही. त्याचे आदेश आज मी देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

तीन दिवसांचा दौरा झाल्यावर सोमवारी मी मुख्यमंत्री व विधानसभेतील आमदारांना कोणकोणत्या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली, किती नुकसान झाले याचा अहवाल देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com