Mungantiwar : चिमुकले व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, याचे समाधान...

तेव्हा त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ही आपल्या कामाची कमाई आहे, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : लहान मुले, ज्यांना अजून जगाचे, व्यवहाराचीही समज आली नाही. खेळण्या-बागडण्याचे त्यांचे दिवस. पण अशा चिमुकल्यांना हृदयरोग होतो आणि शस्त्रक्रिया करावी लागते, ही बाब मन हेलावून टाकणारी आहे. गरीब आईवडील शस्त्रक्रियेचा खर्च करू शकत नाही. अशा परिस्थितीत बालकांची हृदय शस्त्रक्रिया करवून घेऊ शकलो आणि चिमुकल्यांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले, याचे मनस्वी समाधान आहे, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar
...अन्‌ सुधीर मुनगंटीवार मध्यरात्री बारा वाजता पोचले रुग्णालयात!

१८ जून २०२२ रोजी श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर द्वारा आयोजित स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्‍या स्मृतीप्रीत्यर्थ फोर्टीज हॉस्पिटल मुंबई (Mumbai) यांच्‍या विशेष सहकार्याने आयोजित बालकांच्‍या निःशुल्‍क हृदयरोग तपासणी शिबिरात जी बालके हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली, ती बालके त्यांच्या पालकांसह २७ जुलै रोजी मुंबईसाठी रवाना झाली होती. फोर्टीज हॉस्पिटल मुंबई येथे या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. २७ जुलै रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावतीने भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी चिमुकले व त्यांच्या पालकांना मुंबईसाठी निरोप देऊन रवाना केले होते.

रेल्वे स्टेशनवर सदर बालके व त्यांच्या पालकांची भेट घेत त्यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासनही कार्यकर्त्यांनी दिले होते. तेव्हा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजप नेते रामपाल सिंह, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, सुभाष कासनगोट्टूवार, शैलेंद्रसिंह बैस, राजेश सुरावार, सतीश तायडे, अमित कासनगोट्टूवार, यश बांगडे, रूद्रनारायण तिवारी, विठ्ठल डुकरे, सतीश तायडे, अनिश दीक्षित, प्रदीप तिवारी, गजानन पिंपळशेंडे आदी उपस्थित होते. ही बालके यशस्वीपणे शस्त्रक्रिया होऊन ठणठणीत बरी झाली तेव्हा त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ही आपल्या कामाची कमाई आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in