यशोमती ठाकूर पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात दंगली होत आहेत...

यशोमती ठाकूर या दंगलीच्या मास्टरमाइंड आहे, असा घणाघाती आरोप अनिल बोंडे यांनी केला होता. याबाबत खासदार राणा यांना विचारले असता, ते तुम्ही त्यांनाच विचारा असे उत्तर नवनीत राणा (MP Navnit Rana) यांनी दिले.
MP Navnit Rana and Minister Yashomati Thakur
MP Navnit Rana and Minister Yashomati ThakurSarkarnama

प्रकाश गुळसुंदरे

अचलपूर (जि. अमरावती) : अचलपूर शहरातील दुल्ला प्रवेशद्वारावर भगवा झेंडा लावण्यावरून येथे मोठा राडा झाला. झेंडा लावल्यानंतर काहीच वेळात सशस्त्र तरूण रस्त्यावर उतरले आणि तोडफोड सुरू केली. या घटनेनंतर अचलपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज अचलपुरात भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या दंगलीच्या मास्टरमाइंड आहे, असा घणाघाती आरोप भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला होता. याबाबत खासदार राणा (MP Navnit Rana) यांना विचारले असता, ते तुम्ही त्यांनाच विचारा असे उत्तर नवनीत राणा यांनी दिले. पण यशोमती ठाकूर पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात दंगली घडत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कारण गेल्या १२ वर्षांपासून आम्ही अमरावती जिल्ह्यात दंगल बघितली नाही, असेही त्यांनी सांगितले.

रविवारी मध्यरात्रीला दुल्ला प्रवेशद्वारावर झेंडा लावण्यावरून वाद झाला आणि नंतर त्याचे रूपांतर दंगलीमध्ये झाले. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ या परिसरात संचारबंदी करावी लागली. शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता गेल्या तीन दिवसांपासून याठिकाणी संचारबंदी लागू आहे. आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अचलपूर पोलीस स्टेशनला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासंदर्भात सर्वांनी शांततेने राहून एकमेकांना सहकार्य करावे असे आवाहन देखील नवनीत राणा यांनी केले.

MP Navnit Rana and Minister Yashomati Thakur
Video: नवनीत राणा पदर खोचून उतरल्या मैदानात

निष्पाप लोकांना शिक्षा व्हायला नको...

अचलपूरमध्ये दंगलीचं वातावरण झालं होतं. त्यामुळे येथे संचारबंदी लावण्यात आलेली आहे आणि सध्याही सुरू आहे. यातील बऱ्याच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, पण यात काही लोक निष्पाप आहेत, जे फक्त काय झाले, हे बघायला बाहेर पडले आणि पोलिस कारवाईचा बळी ठरले, अशांना शिक्षा व्हायला नको, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या. अशा प्रकारे कुणावर गुन्हे दाखल झाले असतील तर त्याची पडताळणी करण्याच्या सूचना खासदार राणा यांनी पोलिसांना दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com