BJP : २०१४पासून इतर पक्षांमधून भाजपमध्ये किती नेते आले? बावनकुळेंनी आकडाच सांगितला...

Devendra Fadanvis : कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule News : सर्वच पक्षांमध्ये कर्तृत्ववान कार्यकर्ते असतात. कॉंग्रेसमध्येही ते आहेत, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव ठाकरेंकडेही चांगले कार्यकर्ते आहेत. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले आहे. देशात सत्तापरिवर्तन झाले. हे तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही नेतृत्वाला संधी देता. त्यामुळेच पक्ष वाढतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज नागपुरात (Nagpur) म्हणाले.

आम्ही सर्वत्र पूर्ण नाही. शिक्षक, पदवीधर मतदार संघ आणि सहकारमध्येही आम्ही कुठे कुठे कमजोर आहोत. एक अधिक एक दोन नव्हे, तर एक अधिक एक अकरा करण्याचा प्रयत्न कुणीही करणार आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण वगैरे काही नाहीये. तर हे जोडाजोडीचे राजकारण आहे. चांगल्या लोकांना जोडून राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळातील निवडणुकीसाठी (Election) आम्ही मोठी ताकद एकत्र करीत आहोत, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

ग्रामपंचायतींचे निकाल बघा आण येणाऱ्या महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना (शिंदे गट) युतीचे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळालेले दिसेल. शिंदे-फडणवीसांच्या समन्वयामुळे महाराष्ट्रात मोठे परिवर्तन झालेले बघायला मिळेल. त्यासाठी इतर राजकीय पक्षांमध्ये जे चांगले नेतृत्व आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये चांगली संधी आहे.

सत्यजीत तांबे यांनी युवक कॉंग्रेसचे काम महाराष्ट्रभर चांगले केले आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात ते सक्रिय आहेत आणि त्यांचे नाव चांगले आहे. त्यांना भाजपने प्रस्ताव दिलेला नाही, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी त्यांनी आम्हाला अद्याप पाठिंबा मागितलेला नाही. त्या पक्षात त्यांचे काम चांगले आहे, तर त्यांचे नाव घेतले पाहिजे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चांगले कार्यकर्ते आहेत. पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमधील गुण ओळखलेच नाहीत. त्यांना योग्य जबाबदाऱ्या सोपवल्या नाहीत. मग ते निराश होतात, अशा लोकांना भाजप नेहमीच संधी देत आली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काय कारेमोरेजी... तुमच्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नाहीये !

उस्मानाबादमध्ये राणा जगजीत सिंह, नितेश राणे हे भाजपमध्ये आलेले नेते चांगले नेतृत्व करीत आहेत. २०१४ पासून ते आजतागायत १५०च्या जवळपास नेते भाजपमध्ये आले आहेत, ते सर्व नेते चांगले आहेत. युवकांना संधी दिली पाहिजे आणि आम्ही ही संधी युवांना नेहमीच देतो, असे बावनकुळे म्हणाले. मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांना ईडीची नोटीस दिली आहे. त्याची चौकशी होईल आणि त्यानंतर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com