Silver Oak Attack : ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवार म्हणाले...

नाशिकचा अपघात दुर्दैवी आहे. राज्य सरकारच्या वतीने या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. त्या चौकशीतून या अपघाताची कारणं कळतील.
Silver Oak Attack Case
Silver Oak Attack CaseSarkarnama

नागपूर : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या ११८ कामगारांना पुन्हा एसटीच्या सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी ‘हा सरकारचा निकाल आहे, सरकारने ठरवावं’ अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Silver Oak Attack : Sharad Pawar said on the government's decision to reinstate 118 ST workers...)

एसटी कामगारांचा राज्य सरकारच्या सेवेत समावेश करावा, या मागणीसाठी मागील दिवाळीपासून आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनावेळी एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर एप्रिल-२०२२ मध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी एसटीचे ११८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

Silver Oak Attack Case
राणेंना पराभूत करणारे शिवसेना आमदार नाईकांची ‘ACB’कडून चौकशी; संपत्तीचा २० वर्षांचा तपशील मागविला

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली हेाती. त्या बैठकीत कर्मचाऱ्यांचे पगार, सातवा वेतन आयोग, एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण याबाबत चर्चा झाली. तसेच, पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या बडतर्फ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीतच घेऊन टाकला.

Silver Oak Attack Case
‘उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती; आम्ही दुखावलो गेलोय’

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात नागपूरच्या विमानतळावर पत्रकरांशी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, ‘हा सरकारचा निकाल आहे, सरकारने त्याबाबत ठरवावं.’

Silver Oak Attack Case
सोलापूरसह सहा जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीचा निर्णय लवकरच : सहकारमंत्र्यांचे संकेत

नाशिक अपघाताबद्दल शरद पवार म्हणाले की, नाशिकचा अपघात दुर्दैवी आहे. राज्य सरकारच्या वतीने या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. त्या चौकशीतून या अपघाताची कारणं कळतील. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा काम करत आहे. या अपघातात ज्या कुटुंबानी आपले लोक गमावले आहेत, त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. आपण सर्वच जण त्यांच्या दुःखात सहभागी होऊया.

Silver Oak Attack Case
उद्धवसाहेबांसाठी येरवड्यातील एक बेड आरक्षित ठेवा : ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर शिंदे गट आक्रमक!

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत मला काही सांगण्याचे कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भातील निर्णय देईल. आयोगाचा निकाल सर्वच राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल, असे शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटातील निवडणूक चिन्हाच्या वादावर प्रतिक्रिया दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com