Shyam Manav : यांचे धीरेंद्र कृष्ण महाराजांना पुन्हा आव्हान, म्हणाले या नागपुरात !

Nagpur : पुस्तके वाचल्यावर माझ्यात बदल झाला आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करू लागलो.
Shyam Manav and Dhirendra maharaj
Shyam Manav and Dhirendra maharajSarkarnama

Nagpur News : मी स्वतः हिंदू (Hindu) आहे, सनातनी धार्मिक व्यक्ती आहे. सनातन धर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही. भक्तांच्या आड धीरेंद्र कृष्ण महाराज ढोंग करीत आहेत. त्यांनी नागपुरात येऊन माझे आव्हान स्वीकारावे, असे प्रत्युत्तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना दिले.

नागपुरात (Nagpur) बोलताना ते म्हणाले, माझे धर्मगुरू ख्रिश्चन आहेत, यात तथ्य आहे. मी अब्राहम कोर यांची दोन पुस्तके वाचली होती. या पुस्तकात अंधश्रद्धेबाबत लिखाण होते. ही पुस्तके वाचल्यावर माझ्यात बदल झाला आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करू लागलो. मा. गो. वैद्य हे सुद्धा माझे गुरू आहेत. याचा अर्थ मी संघ (RSS) विचारांचा आहे असा होतो का, असा सवाल त्यांनी केला. सनातन धर्माच्या आड माझ्यावर आरोप करीत असेल तर ते योग्य असून या लोकांना सनातन धर्म समजला नाही.

Shyam Manav and Dhirendra maharaj
Thane news : ...अन् आनंद आश्रमावर लागला 'बाळासाहेबांची शिवसेने'चा फलक

सनातन धर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. भक्तांची भावना ओळखून बाबा ढोंग करतात. भक्तांसाठी धीरेंद्र कृष्ण महाराज देव असल्याने त्यांच्यासमोर त्यांना आव्हान पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी पत्रकार भवनात अनोळखी व्यक्तींच्या समोर आपली दिव्यशक्ती सिद्ध करावी, असे आव्हान प्रा. मानव यांनी दिले. महाराजांना काही गोष्टी आधीच कळत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करावी, असे श्‍याम मानव म्हणाले.

Shyam Manav and Dhirendra maharaj
Rohit Pawar : "भाजप आमचा मुख्य विरोधक; त्यांच्याशी युती अशक्य!"

बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले होण्यापूर्वीच महाराजांना कळत असेल तर ते हल्ले आपल्याला मोडून काढता येईल, असेही प्रा. मानव म्हणाले. धीरेंद्र महाराजांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि दिव्य शक्तीचा वापर देशहितासाठी करावा. भोळ्या भाबड्या भक्तांसमोर कसले दिव्य शक्तींचे दर्शन ते घडवतात. खरेच अशी शक्ती त्यांच्याकडे असेल तर सीमेवर जाऊन जवानांना त्यांनी मदत करावी, देशहिताची कामे करावी, असे प्रा. श्‍याम मानव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com