Shrikant Shinde : ‘आपला दवाखाना’मध्ये करणार राऊतांवर उपचार, अजित पवारांच्या पोटदुखीचेही सांगितले कारण !

Bhandara : अजित पवार यांच्यावरही त्यांनी पलटवार केला.
Sanjay Raut, Shrikant Shinde and Ajit Pawar
Sanjay Raut, Shrikant Shinde and Ajit PawarSarkarnama

MP Shrikant Shinde in Vidarbha : रोज सकाळी एक भोंगा वाजतो व खालच्या पातळीवरची भाषा बोलतो, अशी जहरी टिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव घेता केली. संजय राऊत यांना भोंग्याची उपमा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही त्यांनी पलटवार केला. (Criticism will be treated in our hospital)

आज भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात २६४ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी खासदार शिंदे आज (ता. ९) आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अशा उठसूठ टिका करणाऱ्यांचा इलाज ‘आपल्या दवाखाना’ मध्ये होणार आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवस-रात्र काम करीत आहेत. हे बघवत नसल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे. असे असले तरीही आम्ही ७०० ‘आपला दवाखाना’ उघडले आहेत. यांपैकी कुठल्याही एका दवाखान्यात त्यांना उपचार घेता येतील. जेणेकरून रोज सकाळचा भोंगा बंद होईल आणि राज्यातील लोकांना शांती लाभेल, असेही शिंदे म्हणाले.

Sanjay Raut, Shrikant Shinde and Ajit Pawar
MP Shrikant Shinde News: सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पुढारी कंत्राटदाराची भाषा बोलत आहेत !

शिंदे-फडणवीसांना संपूर्ण देश ओळखतो..

गेल्या १० महिन्यांत जे काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले. त्यामुळे संपूर्ण देश त्यांना ओळखतो. भविष्यातही लोकांना हेच सरकार हवे आहे. काही लोकांच्या लक्षात ही बाब आली असल्याने गरज नसेल तेथेही सरकारवर आणि मंत्र्यांवर टिका केली जात आहे. केवळ टिका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा विरोधी पक्षाचे काम योग्य पद्धतीने करा, असा सल्लाही खासदार शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला.

कर्नाटकमधील (Karnataka) निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस यांना कोण ओळखतो, अशी खिल्ली अजित पवार यांनी उडविली होती, त्याचा खरपूस समाचार आज श्रीकांत शिंदे यांनी घेतला. अजित पवारांना (AJit Pawar) प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, आम्ही १० महिन्यात साडेबारा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांना दिले आहे. लोकांची कामे करत आहोत. त्यामुळे सगळा देश शिंदे फडणवीस यांना ओळखत असल्याने दादांच्या पोटात दुखत आहे.

Sanjay Raut, Shrikant Shinde and Ajit Pawar
Shrikant Shinde News : अखेर श्रीकांत शिंदेंनी मौन सोडलं; म्हणाले,''महाराष्ट्राला राऊतांची गरज,कारण...''

अडीच वर्ष बंद होते वर्षाचे दरवाजे..

सुरुवातीचे अडीच वर्ष सामान्य लोकांसाठी वर्षा बंगल्याचे दरवाजे बंद होते. फक्त दोन-चार टवाळक्यांनाच प्रवेश होता, असे म्हणत शिंदेंनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केली. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मंत्र्यांनाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळेच त्यांच्यावर आजची वेळ आली. पण अडीच वर्षात जे झाले नाही, ती सर्व ठप्प पडलेली कामे आम्ही केवळ १० महिन्यांत केल्याचेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com