Wainganga river

Wainganga river

धक्कादायक! धावत्या रेल्वेतून बाळ नदीत पडलं, बाळाला वाचवताना आईही...

इशांत आपल्या पत्नी आणि दीड वर्षांच्या बाळाला घेऊन नागपूरहून (Nagpur) रेवाकडे निघाला होता.

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या रेल्वेतून नदीत पडून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूजा इशांत रामटेके (Puja ramteke) आणि त्यांचा 18 महिन्यांचा मुलगा नागपूरहून रेवा येथे जात असताना रात्रीच्या वेळी देव्हाडा-माडगी वैनगंगा नदीच्या (Devada-Madgi Wainganga river) पुलावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इशांत रामटेके (Ishant Ranteke) हा नागपूरच्या (nagpur) सैनिक शाळेत शिक्षक आहे. हा सुट्टी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकावरुन रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता. तुमसर रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे जात असताना इशांतला सांगून पूजा ट्रेनमधील स्वच्छतागृहात निघाली होती. दीड वर्षाच्या मुलगाही तिच्यासोबत होता. धावत्या रेल्वेतही चिमुकला धावत निघाला पण काही कळण्याच्या आतच वैनगंगा नदीच्या रेल्वे पुलावरुन तो नदीत कोसळला.

<div class="paragraphs"><p>Wainganga river</p></div>
महाविकास आघाडीची गोव्यातही हवा; राजकीय हालचालींना वेग

मुलगा नदीत पडल्याचे पाहताच भान विसरलेली पूजाही त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन तीसुद्धा रेल्वे पुलावर कोसळली. या घटनेत पूजासह तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याची प्राथामिक माहिती भंडारा पोलिसांकडून मिळाली आहे.

दरम्यान, बराच वेळा झाला तरी पत्नी आणि मुलगा परत न आल्याने इशांतने त्यांची शोधाशोध केली. परंतु दोघेही कुठे न सापडल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार दिली. सोमवारी रेल्वे पोलिस गस्तीवर असतांना त्यांना एका महिलेचा मृतदेह पुलाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तर मुलाचा मृतदेह नदीतून मिळाला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. इशांतने दोन्ही मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृतदेह शिवविच्छेदनासाठी तुमसर येथे पाठवण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com