यवतमाळमध्येही शिवसेनेला धक्का : खासदार भावना गवळींचे समर्थक गेले शिंदे गटात

शिवसेना खासदार भावना गवळी ( Bhawana Gawali ) यांचे समर्थक आज शिंदे गटात गेले.
Bhawana Gawali
Bhawana GawaliSarkarnama

यवतमाळ - राज्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शिवसेना खासदार भावना गवळी ( Bhavana Gawli ) यांचे समर्थक आज शिंदे गटात गेले. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जात आहे. ( Shock to Shiv Sena in Yavatmal too: MP Bhavana Gawli's supporters joined Shinde group )

एकनाथ शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या नेतृत्त्वाखाली खासदार गवळी यांचे समर्थक शिवसेनेत आज दाखल झाले. संजय राठोड यांच्या समर्थकांनी काल शिवसेनेला समर्थक पत्र दिले होते. मात्र गवळी समर्थकांनी आपली भूमिका आज स्पष्ट केली.

Bhawana Gawali
ईडीच्या चौकशीला भावना गवळी हजर राहतील का ? ; किरीट सोमय्या म्हणाले..

यवतमाळ, बाभूळगावचे नगरसेवक, यवतमाळ जिल्ह्यातील गवळी समर्थक कार्यकर्ते, शिवसेना कार्यकर्ते विश्रामभवन येथे एकत्रित आले. त्यांनी खासदार भावना गवळींवरील कारवाईवरून शिवसेनेला दोषी ठरवत शिंदे गटात प्रवेश केला. समर्थन पत्र लिहून देऊन ते अधिकृत रित्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

Bhawana Gawali
खासदार भावना गवळी हरविल्या, भाजपची पोलिसांत तक्रार…

संजय राठोड, भावना गवळी यांसारख्या नेत्यांचे समर्थक शिंदे गटात जाऊ लागल्याने यवतमाळ ते वाशिम हा भाग शिंदे गटाच्या वर्चस्वाखाली येऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेत नवीन पदाधिकारी नियुक्त्या झाल्या होत्या. त्यामुळे आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in