Shivsena News: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आता समोर येणार 'हे' संकट..!

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवर परिणाम नाही.
Prakash Ambedkar and Uddhav Thackeray. News
Prakash Ambedkar and Uddhav Thackeray. NewsSarkarnama

Uddhav Thackeray News : पक्षाचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला नवीन पक्ष स्थापन करावा लागणार आहे. त्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल. सध्याची परिस्थिती बघता त्यापूर्वीच म्हणजे एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहवे लागू शकते, असे भाकित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंंबेडकर यांनी वर्तविले. अकोला येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्यच करावा लागेल, असे सांगून वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याने सांगितले.

आमची युती ही वैयक्तिक असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. त्यासोबत त्यांनी महाविकास आघाडीत वंचितला घेण्याबाबतचा निर्णय हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायचा आहे.

आमची युती ही ठाकरे यांच्यासोबत आहे. इतर पक्षांसोबत नाही. महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरे यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा एकटेच निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शिष्टाई करणार नाही..

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी कुठही शिष्टाई करणार नाही. तो माझ्या अखत्यारीतील विषय नाही, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar and Uddhav Thackeray. News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे अमित शाहांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले...

माझे दोन चेहरे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतच्या बैठकांबाबत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, माझे दोन चेहरे आहेत.

एक बाबासाहेबांचा नातू म्हणून तर दुसरा राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून. बाबासाहेबांचा (Dr. Babasaheb Ambedkar) नातू म्हणून इंदू मिल स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला मी उपस्थित राहिलो तर राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती ही माझी राजकीय भूमिका असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

सन २०२४ पर्यंतच्या सर्व निवडणुकांसाठी युती..

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही सन २०२४ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आहे. त्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com