Shivsena News: नागपुरातील शिवसेना भवनाचे भाडेच भरले नाही, अन् उद्धव ठाकरे म्हणतात लढा !

Nagpur : ते ग्रामीणचे कार्यालय असले तरी शहरातील पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Nagpur Shivsena Office News : धनुष्यबाण आणि शिवसेना हातून गेल्यानंतर पुढे काय करायचे, अशा पेचात उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक पडले आहेत. ते सर्व मुंबईच्या आदेशाची वाट बघत आहेत. पण अद्याप त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून आदेश मिळालेले नाहीत.

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बहाल केले आहे. त्याचा सर्वत्र जल्लोश सुरू आहे. आमदारांनी विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाचाही ताबा घेतला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेचे तसे अधिकृत कार्यालय भाडे भरले नसल्याने आधीच रिकामे करण्यात आले आहे. रेशीमबागेत एक शिवसेना भवन आहे. ते ग्रामीणचे कार्यालय असले तरी शहरातील पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नागपूर शहरातील सैनिकांना कार्यालयच नाही आणि ते लढण्याच्या गोष्टी करीत आहेत. नाव आणि चिन्ह गेल्यानंतर तसेच सैनिकांचे खच्चीकरण झालेले आहे, मनोबल खालावलेले आहे. ‘मी खचलो नाही, तुम्हीही खचू नका’, असे म्हणत उद्धव ठाकरे सैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहे. कार्यालयासारखी महत्वाची सुविधा जर पक्ष सैनिकांना देऊ शकत नसेल आणि त्यांना लढ म्हणत असेल, तर कसे होणार, असा प्रश्‍न सैनिकांना पडला आहे. ही आणि अशा अनेक लहान मोठ्या अडचणींना नागपुरातील शिवसैनिक सामोरे जात आहेत. त्यामुळे येथे उद्धव ठाकरेंची सेना पुन्हा उभी राहील, असे वाटत नाही.

शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांना आता मुंबईतून काय आदेश येतात, याची प्रतीक्षा आहे. शिंदे सेनेत जाणारे आधीच गेले आहेत. आता कोणी जाईल असे वाटत नाही. त्यामुळे मुंबईतून जे आदेश येतील त्यानुसार आम्ही काम करणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाला उद्धव ठाकरे यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray :..तर येणारी लोकसभा निवडणूक शेवटची असेल; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावतीने कॅव्हेट दाखल केला आहे. त्यामुळे तुर्तास यावर निर्णय होण्याची शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत महापालिका (Municipal Corporation) निवडणूक जाहीर झाल्यास ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांची मोठी फजित होणार आहे. कुठला झेंडा हाती घ्यायचा, असा प्रश्न या निर्माण होणार आहे. या गोंधळात दोन्ही गटांच्या सैनिकांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती वर्तविल्या जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com