Shivsena News: शिवसेनेच्या मतांचे झाले विभाजन, भाजप हिंदू मते वळवणार आपल्याकडे !

BJP : शिवसेनेची मते वळवण्यात येतील, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
BJP and Sivsena
BJP and SivsenaSarkarnama

Shivsena and BJP News : निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाले आहे. आता ही विभाजित झालेली मते भाजप आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात लागलेली आहे. त्यातल्या त्यात हिंदू मते आपल्याकडे वळवण्याकडे भाजपचा कल असल्याचं दिसतंय.

भाजपच्या या प्रयत्नात केवळ उद्धव ठाकरेंच्या सेनेची मते वळविली जातात की एकंदरीतच शिवसेनेची मते वळवण्यात येतील, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेसोबत भाजपची युती आहे. त्यामुळे शिवसेनेची मते भाजपने वळवायला नको, असे शिंदे गटातील लोक बोलताना दिसतात. पण भाजपने तसे केल्यास भविष्यात शिवसेनेला धोका होण्याचा संभव आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.

हा कार्यक्रम रावबविण्यासाठी भाजपची योजना तयार आहे. त्यासाठी येत्या चार आणि पाच मार्चला मुंबईतील रामभाऊ प्रबोधिनीच्या सभागृहात भाजपच्या सर्व प्रवक्त्यांचे शिबिर घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच राज्याचा दौरा केला. त्यानंतर आखण्यात आलेल्या रणनीतीला गती देण्याचा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला.

शिबिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्यतिरिक्त प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, माधव भंडारी प्रामुख्याने मार्गदर्शन करतील. मीडिया प्रभारी नवनाथ बन व सहप्रभारी विश्वास पाठक हेसुद्धा आखलेल्या धोरणाची माहिती देणार आहेत. शिबिराला नागपूरमधून प्रदेश प्रवक्ते आमदार प्रवीण दटके, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी, शिवानी दाणी, मिलिंद कानडे सहभागी होतील. सोबतच विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यातील प्रचार प्रमुखांनाही बोलावण्यात आले आहे.

BJP and Sivsena
BJP News : भाजपाची पुण्यात मोठी खेळी, 'या' मानकरांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

भाजपच्या (BJP)_ प्रदेश कार्यकारिणीची बैठक १० व ११ फेब्रुवारीला नाशिक येथे घेण्यात आली. त्यात महाविजय २०२४ संकल्प करण्यात आला. या अभियानांतर्गत लोकसभेच्या ४८ पैकी ४५ तर विधानसभेच्या २८७ पैकी १५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. भाजपने गोळा केलेल्या माहितीनुसार, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Election) पक्षाला हिंदू समाजाची २८ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेला (Shivsena) १९, काँग्रेस १८, राष्ट्रवादीला १७ टक्के मते मिळाली होती. आता शिवसेना फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत असल्याने हिंदू मतांचा टक्का भाजपकडे वळवण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com