Shivsena : शिंदे गटातील निधीच्या वादावरील बैठक पुढे ढकलली !

Akola : जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांनी थेट कमिशनखोरीचा आराेप केला होता.
Akola Shivsena
Akola ShivsenaSarkarnama

Shivsena Eknath Shinde News : विकास निधीवरून शिवसेनेच्या शिंदे गटात सुरू असलेल्या वादावर ताेडगा काढण्यासाठी उद्या मुंबईत बैैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता ही बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक शुक्रवारी मुंबईतच होणार असल्याची माहिती आहे.

माजी आमदार तथा संपर्क प्रमुख गाेपीकिशन बाजाेरीया यांच्यावर निधी वितरणात त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांनी थेट कमिशनखोरीचा आराेप केला होता. आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष अश्विन नवले, महानगराध्यक्ष याेगेश अग्रवाल, शशिकांत चाेपडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठलेल्या पत्रातून हा आरोप केला हाेता. त्यानंतर वाशीम जिल्हा दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता विमानतळावरही या पदाधिकाऱ्यांनी भेटून त्यांची बाजू मांडली होती.

मुख्यमंत्र्यांच्या दरबारात विषय पोहोचल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात होते. त्यात सर्वांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मुंबईत हाेणाऱ्या बैठकीत सर्व बाबी स्पष्ट करू, असे संपर्क प्रमुख गाेपीकिशन बाजाेरीया यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जिल्हाप्रमुख गटाकडून कागदपत्रे गाेळा करण्यात आली आहेत.

हे कागदपत्रे आता मुंबईतील बैठकीत सादर केले जाणार होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व प्रमुख नेते सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत व्यस्त असल्याने बैठकच एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून, नेत्यांनी शुक्रवारी मुंबईत हजर होण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती आहे.

Akola Shivsena
Eknath Shinde : आघाडी, युतीच्या दिग्गज नेत्यांमुळे वाढली प्रचारातील शेवटच्या टप्यात रंगत

काय आहे नेमका वाद?

विकास निधीवरून शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे (Eknath Shinde) गटात सुरू असलेला वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पाेहाेचला आहे. माजी आमदार बाजाेरीया यांच्यावर निधी वितरणात कमिशनचा आराेप जिल्हाध्यक्ष अश्विन नवले, महानगराध्यक्ष याेगेश अग्रवाल, शशिकांत चाेपडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठलेल्या पत्रात केला हाेता. यावर बाजाेरीया यांनी ता. १२ फेब्रुवारी राेजी पत्रकार परिषदेत घेत भाष्य करीत आराेप फेटाळले होते.

दाेन्ही बाजुंनी तयारी..

मुंबईत (Mumbai) हाेणाऱ्या बैठकित सर्व बाबी स्पष्ट करू, असे संपर्क प्रमुख गाेपीकिशन बाजाेरीया यांनी यापूर्वीच स्पष्ट केले असून, त्यांच्याकडे कागदपत्रेही आहेत. काेणत्या पदाधिकाऱ्याला काेणती कामे दिली, याची माहिती त्यात आहे.

जिल्हाप्रमुख (District Chief) गटाकडून कागदपत्रे गाेळा करण्यात येत आहेत. यापूर्वी संपर्क प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून जिल्हा प्रमुख गटानेही पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसह बाजू मांडण्याची तयारी केली हाेती. मात्र, नंतर ही पत्रकार परिषदच रद्द झाली हाेती. त्यामुळे हे कागदपत्रे आता बैठकीत सादर हाेण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com